घरपालघरविराथन बुद्रुक येथे भव्य संपूर्ण मोफत आरोग्य-औषधे शिबिराचे आयोजन

विराथन बुद्रुक येथे भव्य संपूर्ण मोफत आरोग्य-औषधे शिबिराचे आयोजन

Subscribe

त्वचा विकार, वात रक्त, संधिवात, आमवात, संधीवात इत्यादींचे आणि अशा प्रकारच्या अन्य आजारांचे संदर्भात आरोग्य तपासणी व निदान व त्या संदर्भातल्या औषधांची मोफत पूर्तता केली जाणार आहे. 

सफाळे: भारत सरकारच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी भव्य अशा “संपूर्ण मोफत आरोग्य-औषधे शिबिराचे आयोजन पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील विराथन बुद्रुक येथील चाफावाडी मैदानात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान राबविले जाणार आहे.
भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालयाच्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे पालघर सदस्य कुणाल पाटील १३ जानेवारी २०२४ रोजी पालघर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोदाडे यांना सदर शिबिर हे सफाळे विभागातील साधारण ३७ ग्रामपंचायतीमधील महिला पुरुष आणि बालकांची संपूर्ण आरोग्य तपासणी करुन त्यांना मोफत सात दिवसांच्या औषधांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती दिली. तसेच ही माहिती त्यानी ग्रामपंचायतीपर्यंत पोहचविण्याची मागणी केली होती.
 महाराष्ट्र शासनाचे म आ पोदार व रा आ पोदार रुग्णालय (आयु) वरळी मुंबईचे विविध आरोग्य चिकित्सा विभागातील तब्बल 40 डॉक्टरांची टीम ज्यात वरिष्ठ डॉक्टर हे पीएचडी, एमडी, एमएस स्तराचे स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, वृद्धतज्ञ, पुरुष तज्ञ अशा विविध तज्ज्ञांकडून संपूर्ण आरोग्याची तपासणी तसेच मोफत औषध गोळ्या ड्रॉप्स ऑइंटमेंट तेल इत्यादींचे वाटप होणार आहे.  नवजात बालकांपासून ते सोळा वर्षे बालकांपर्यंत अगदी सुवर्णप्राशनाचे डोस मोफत दिले जाणार आहेत. महिलांसाठी स्तन कॅन्सर गर्भाशी संबंधित विकार स्तन कॅन्सर, गर्भाशय संबंधित विकार इत्यादींची तपासणी तसेच जनजागृती व्याख्यान व प्रशिक्षण दिले जाणार आहे. ह्या शिबिरामध्ये सर्व नेत्ररोग, कान, नाक, घसा, मधुमेहजन्य विकार, तिरळेपणा मोतीबिंदू काचबिंदू मूळव्याध परिकार्तिका उंडूक पुच्छा, शोधस्तन ग्रंथी, मधुमेहजन्य व्रण, वंध्यत्व, श्वेतप्रदर, कष्टार्थ अनर्थ गर्भिणी हर्दि सुतिका विकार ज्वर कृमी कास अतिसार, त्वचा विकार, वात रक्त, संधिवात, आमवात, संधीवात इत्यादींचे आणि अशा प्रकारच्या अन्य आजारांचे संदर्भात आरोग्य तपासणी व निदान व त्या संदर्भातल्या औषधांची मोफत पूर्तता केली जाणार आहे.
 या शिबिरात खासदार राजेंद्र गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी पालवे, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी रेवंडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोदडे ह्या सगळ्यांच्या सहकार्याने व केंद्रीय समिती सदस्य कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांनी येत्या शनिवारी राबविले जाणार आहे. तरी सर्व ग्रामीण भागातील सफाळे परिसरातील ग्रामपंचायतीतील नागरिकांना महाराष्ट्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या ह्या संपूर्ण आरोग्य औषधे शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -