घरठाणेकोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा

कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा

Subscribe

युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी

ठाणे । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन 24 व 25 फेब्रुवारी रोजी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवडा, ठाणे (पश्चिम) येथे करण्यात येणार आहे. हा रोजगार मेळावा महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या माध्यमातून 1 लाख 50 हजार युवक/युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील अन्य जिल्ह्यातील कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती प्रशासनास द्यावी तर नोकरी, रोजगार इच्छुक बेरोजगार युवक-युवतींनी आपली नोंदणी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी केले. नमो महारोजगार मेळावा संबंधीची पूर्वतयारी आढावा बैठक 15 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्यासह उमेद च्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे, कामगार उपायुक्त प्रदीप पवार, समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे, कार्यकारी अभियंता सा.बां. (विद्युत) संजय पुजारी, महानगरपालिकांचे अधिकारी, विविध औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी हे प्रत्यक्ष तर इतर जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -