घरपालघरपापलेटला ’राज्य मासा’चा दर्जा देण्यात यावा

पापलेटला ’राज्य मासा’चा दर्जा देण्यात यावा

Subscribe

शाश्वत मासेमारी पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या व जागरूकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ’सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था’ व ’दि सातपाटी फिशरमेन सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड’ यांनी वरील मागणी केली आहे.

पालघर: सिल्व्हर पॉम्पलेटला अर्थात पापलेट माशाची उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असल्याने महाराष्ट्र राज्याचा ’राज्य मासा’ म्हणून घोषित करण्याची मागणी सातपाटीमधील दोन मच्छीमार सहकारी संस्थांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. सिल्व्हर पॉम्पलेट या माशाला स्थानिक पातळीवर पापलेट किंवा सरंगा म्हणून ही ओळखले जाते. सिल्वर पॉम्फ्रेटला (पापलेट) च्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असल्याने या मत्स्य प्रजातीची जतन करण्यासाठी या मासाला ’राज्य मासा’ म्हणून अधिकृत दर्जा मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्राच्या सागरी जलादी क्षेत्रातील पॅम्पस (सिल्वर पॉमफेट) पापलेट या मत्स्य प्रजातीचे जतन करण्यासोबतच सागरी परिसंस्थेचे रक्षण, लहान माशांच्या मासेमारीला आळा घालणे आणि शाश्वत मासेमारी पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या व जागरूकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ’सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था’ व ’दि सातपाटी फिशरमेन सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड’ यांनी वरील मागणी केली आहे.

१९८० पासून सिल्वर पॉम्फ्रेटलचे उत्पादन कमी

- Advertisement -

महाराष्ट्रात १९८० पासून सिल्वर पॉम्फ्रेटलचे उत्पादन कमी होत चालले आहे. पापलेटचे सरासरी वार्षिक उत्पादन १९६२-१९७६ दरम्यान ८३१२ टन, १९९१-२००० दरम्यान ६५९२ टन आणि २००१- २०१० दरम्यान ४४४५ टन आणि २०१०-२०१८ मध्ये ४१५४ टन पापलेट उत्पादन झाले आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पापलेट व्यापारातील बदलासह मासेमारी पद्धतीतील बदलांमुळे लहान माश्यांच्या पापलेट माश्यांची मासेमारी मोठ्याप्रमाणात होत असल्याने भारताच्या वायव्य भागातील पापलेट माश्याचा साठ्यावर विपरित परिणाम झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -