घरपालघरविद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार

विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार

Subscribe

महापालिकेने हा आहार पुरवण्यासाठी तीन सामाजिक संस्थांना ठेका दिला आहे. पोषण आहार तयार करण्यासाठी लागणारे साहित्य शासनाकडून दिले जाते.

भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शहरप्रमुख प्रशांत सावंत आणि शाखाप्रमुख नरेंद्र उपरकर यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाने पोषण आहार पुरवठा करणार्‍या ठेकेदाराला नोटीस बजावली असून खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मीरा-भाईंदर शहरात महापालिकेच्या ३६ शाळा व काही अंगणवाड्या आहेत. या शाळांमध्ये आठ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेकडून या विद्यार्थ्यांना एक वेळेचा पोषण आहार पुरवला जातो. महापालिकेने हा आहार पुरवण्यासाठी तीन सामाजिक संस्थांना ठेका दिला आहे. पोषण आहार तयार करण्यासाठी लागणारे साहित्य शासनाकडून दिले जाते.

या संस्थांकडून पोषण आहार तयार करून दिला जातो. विद्यार्थ्यांना पोषण आहारात दररोज वेगवेगळे पदार्थ देणे आवश्यक आहे. परंतु या संस्था अनेक वेळा विद्यार्थ्यांना खिचडी देत जात असल्याचे दिसून येते. ही खिचडी व्यवस्थित व दर्जेदार नसल्याचे आढळून आले आहे. तसेच आहारात वेगवेगळे पदार्थ दिले जात नाहीत. शिवसेना ( ठाकरे गट ) शहरप्रमुख प्रशांत सावंत व शाखाप्रमुख नरेंद्र उपरकर यांनी माशाचा पाडा, काशीगाव या शाळेला भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली असता तेथील पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे आढळून आले. त्या शाळेसंदर्भात उपरकर यांनी आयुक्तांकडे तक्रार केली. जर सदरील जेवणाचा दर्जा न-सुधारल्यास व ठेकेदारांवर कारवाई न-केल्यास आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -