घरपालघर'या' मोठ्या ग्रामपंचायतीत मनसेचा विक्रमी विजय

‘या’ मोठ्या ग्रामपंचायतीत मनसेचा विक्रमी विजय

Subscribe

मनसेच्या सीमा भोईर यांनी ४९८ मतांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना मात दिली आहे.

नदीम शेख,पालघर:  पालघर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत सातपाटी आहे. या ग्रामपंचायतीत सर्वपक्षीय ग्राम विकास आघाडी विरुद्ध मनसे लढत झाली असून काही प्रभागात अपक्ष ही निवडणुकीच्या या मैदानात निवडणूक लढवीत होते. या सर्वांना मनसेकडून पटखणी देण्यात आली असून थेट सरपंच निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत मनसेच्या सीमा भोईर यांनी ४९८ मतांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना मात दिली आहे.
तर पालघर तालुक्यातील धनसार येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मैदान बचाव संघर्ष समितीने बाजी मारली असून सर्वच जागा जिंकल्या आहेत. मैदान बचाव संघर्ष समितीचे १० पैकी १० उमेदवार जिंकून आले आहे. शिवशाही ग्रामविकास पॅनलचा मैदान बचाओ संघर्ष समितीने पराभव करत दणदणीत विजय मिळवून आल्यानंतर मोठ्या जल्लोष करण्यात आला. यावेळी सरपंचपदी  राखी पाटील या निवडून आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -