घरपालघरएकाच दिवशी १८ पुस्तकांचे प्रकाशन

एकाच दिवशी १८ पुस्तकांचे प्रकाशन

Subscribe

तर अरुण म्हात्रे म्हणाले की, अशोक मुळे आत्मचरित्र लिहितीलच पण आमच्या प्रत्येकाच्या आत्मचरित्रात एक प्रकरण त्यांच्यावर असेल. राजेंद्र पै, डॉ. प्रदीप कर्णिक यांनीही आपले मनोगत व्क्त केले.

वसई : डिंपल पब्लिकेशनने पन्नासाव्या वर्षात १२ लेखकांची तब्बल १८ पुस्तके प्रकाशित केली. सुवर्ण महोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी गंगाराम गवाणकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित होते. डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे व डिंपल पब्लिकेशन यांच्यासह लेखक,अभिनेता संग्राम समेळ, ज्येष्ठ लेखक प्रा. अशोक चिटणीस, ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, ज्येष्ठ कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे, राजेंद्र पै, डॉ. प्रदीप कर्णिक, डॉ.मेधा मेहेंदळे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात गंगाराम गवाणकर यांनी डिंपल पब्लिकेशनच्या पाच दशकी वाटचालीचा थोडक्यात आढावा घेताना अशोक मुळे यांच्या परिश्रमाची दखल घेतली. प्रा. अशोक चिटणीस यांनी अशोक मुळे यांनीच आत्मचरित्र लिहावे व ते प्रसिद्ध करावे, अशी इच्छा व्यक्त केली. तर अरुण म्हात्रे म्हणाले की, अशोक मुळे आत्मचरित्र लिहितीलच पण आमच्या प्रत्येकाच्या आत्मचरित्रात एक प्रकरण त्यांच्यावर असेल. राजेंद्र पै, डॉ. प्रदीप कर्णिक यांनीही आपले मनोगत व्क्त केले.

१२ लेखकांची १८ पुस्तके यावेळी प्रकाशित करण्यात आली. त्यात अशोक समेळ यांचे ‘ते आभाळ भिष्माचं होतं’ याची दुसरी आवृत्ती, ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ची आठवी आवृत्ती, गंगाराम गवाणकर यांचे ‘वाटेला सोबत हवी’ हे नाट्यपुस्तक, इंद्रायणी सावकार यांची ‘अंगराज कर्ण’, ‘चक्रवर्ती चंद्रगुप्त मौर्य’, ‘छत्रपती संभाजी महाराज’, ‘चंद्रगुप्त विक्रमादित्य’ व ‘महाराणी दुर्गावती’ ही पाच पुस्तके संदेश जाधव यांचे आत्मचिंतनपर ‘सार्थक’, प्रा. अशोक चिटणीस यांचे ‘अद्वैत’, अरुण म्हात्रे यांचे ‘विसरता येत नाही’ हे दोन कविता संग्रह व ‘उंच माझा झोका’, डॉ. विजया वाड यांचे ‘आनंदाचे पान’, प्रा. अविनाश कोल्हे यांचे ‘वाळूचे किल्ले’, अ‍ॅड. अशोक भाईडकर यांचे ‘लीडर’, सुनील जाधव यांचे ‘मायावी’, श्रीनिवास खांगटे यांचे ‘माझा फेसबुक कट्टा’ व तुळशीदास घरत यांचे ‘मी एक जीवनयात्री’ या पुस्तकांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -