घरपालघरमहालक्ष्मी जत्रेतील पाळण्यात अपघात झाल्याची अफवा

महालक्ष्मी जत्रेतील पाळण्यात अपघात झाल्याची अफवा

Subscribe

तसेच सदरची चित्रफित ही दिशाभूल करून गैर समज पसरवणारी असल्यामुळे ती सोशल मीडियावर व्हायरल करू नये असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.

डहाणू: जत्रेतील करमणुकीच्या आकाश पाळण्यात अपघात झाल्याची एक चित्रफित सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा अपघात विवळवेढे इथे सुरू असलेल्या महालक्ष्मी जत्रेत झाल्याची अफवा सध्या पसरली आहे. यामुळे जत्रेत येणार्‍यांमध्ये सध्या संशययुक्त भीतीचे वातावरण पसरले आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा म्हणून नावलौकिक असलेल्या महालक्ष्मी जत्रेत एका पाळण्याचा अपघात झाल्याची अफवा काही खोडसाळ वृत्तीच्या लोकांकडून पसरवण्यात येत आहे. मात्र ही घटना खोटी असून चित्रफितीत दिसणारा अपघात हा इतरत्र कुठेतरी घडला असल्याचा खुलासा पोलिसांमार्फत करण्यात आला आहे. तसेच सदरची चित्रफित ही दिशाभूल करून गैर समज पसरवणारी असल्यामुळे ती सोशल मीडियावर व्हायरल करू नये असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.

महालक्ष्मी जत्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या गगनचुंबी आकाश पाळणे, ब्रेक डान्स आणि इतर पाळण्यांची संबंधित विभागांकडून तपासणी करून त्यांना परवाने देण्यात आले असून याबाबतचे सर्व रिपोर्ट्स तहसीलदार डहाणू यांना सोपवण्यात आल्याची माहिती कासा पोलीस स्टेशन प्रभारी श्रीकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे जत्रेतील पळण्यांमध्ये अपघात घडण्याची शक्यता कमी असून प्रसंगी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठीच्या सर्व उपाययोजना प्रशासनाकडून सज्ज करून ठेवण्यात आल्याची खात्री त्यांनी दिली आहे. जत्रेत येणार्‍या नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

कोट –
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ महालक्ष्मी यात्रेतील नसून इतर ठिकाणचा आहे. ज्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे त्यांनी तो व्हायरल करून अफवा पसरवू नये. कुठल्याही प्रकारच्या घटनेची खात्री केल्याशिवाय त्याबाबत चुकीची माहिती पसरवणे हा गुन्हा असून यासाठी संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते.
– श्रीकांत शिंदे, प्रभारी, कासा पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -