घरताज्या घडामोडीनिवडणूक आयोगाच्या निर्णयावर कायदेशीर पावलं उचलणार - सुनील तटकरे

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कायदेशीर पावलं उचलणार – सुनील तटकरे

Subscribe

'आम्ही राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आता आयोगानं जो निर्णय घेतला आहे त्याबाबत कायदेशीर पाऊल उचलणार आहोत', असे राष्ट्रवादी काँग्रेसते नेते सुनील तटकरे यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सुनील तटकरे यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आम्ही राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आता आयोगानं जो निर्णय घेतला आहे त्याबाबत कायदेशीर पाऊल उचलणार आहोत’, असे राष्ट्रवादी काँग्रेसते नेते सुनील तटकरे यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सुनील तटकरे यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (Will take legal action on Election Commissions decision says ncp leader Sunil Tatkare)

नेमके काय म्हणाले सुनील तटकरे?

- Advertisement -

“जो निर्णय आला आहे त्याच्याविषयी अधिकृत माहिती आलेली नाही. आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांकडून सल्ला घेणार आहोत. आमच्याकडे निर्णयाची प्रत आलेली नाही. पंधरा दिवसांपूर्वी आयोगानं आम्हाला आमचे म्हणणे मांडण्यासाठी मुभा दिली होती. आम्ही राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आता आयोगानं जो निर्णय घेतला आहे त्याबाबत कायदेशीर पाऊल उचलणार आहोत”, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान, किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


हेही वाचा – मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द; शरद पवारांना मोठा धक्का

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -