घरपालघरमहापालिकेच्या आरक्षित जागेवर देखील महाघोटाळा

महापालिकेच्या आरक्षित जागेवर देखील महाघोटाळा

Subscribe

त्यामुळे सदर आरक्षित व सरकारी मालकीच्या जमिनीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून फसवणूक झालेली आहे, अशा व्यक्तींनी मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेत लेखी तक्रार करावी, असे जाहीर आवाहन पोलिसांनी केले आहे.

वसईः वसई – विरार महापालिकेच्या नालासोपारा आचोळे येथील डंम्पिंग ग्राऊंड आणि एसटीपीसाठी आरक्षित असलेल्या खासगी आणि सरकारी मालकीच्या जागेवर जमिनीचे खोटे दस्ताऐवज बनवून अनधिकृत इमारतींमधील सदनिका विकल्याचे उजेडात आले आहे. त्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. बनावट रेरा, दस्त नोंदणी करून विरार शहरात तब्बल ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे उजेडात आणल्यानंतर वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून प्रभागांतर्गत बांधकाम झालेल्या इतर इमारतींचे त्वरित सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच संबंधित अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांविरोधात विरार पोलिसांसोबत समन्वय साधून एमआरटीपी व फौजदारी कलमांतर्गत तात्काळ गुऩ्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. याच शोधमोहिमेतून वसई-विरार महापालिकेच्या मौजे आचोळे सर्व्हे क्रमांक २२ ते ३४ या मधील डम्पिंग ग्राउंड ४५१ व एसटीपी ४५० करता आरक्षित असलेल्या खासगी जमीन व सरकारी मालकीच्या जमिनीचे खोटे दस्तावेज बनवून त्याद्वारे विक्री करून लोकांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे सदर आरक्षित व सरकारी मालकीच्या जमिनीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून फसवणूक झालेली आहे, अशा व्यक्तींनी मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेत लेखी तक्रार करावी, असे जाहीर आवाहन पोलिसांनी केले आहे.

विरार पोलिसांनी बनावट रेरा, दस्त नोंदणी करून इमारती बांधल्याचे प्रकरण उजेडात आणले होते. प्रभाग समिती ‘सी चंदनसार कार्यक्षेत्रातील मौजे कोपरी येथील सर्व्हे क्रमांक १३७ हिस्सा नंबर २ अ या जागेवरील रुद्रांश ‘ए व ‘बी या इमारतींचा समावेश होता. मात्र, त्याआधी या अनधिकृत इमारती विनापरवानगी बांधल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर वसई-विरार महापालिकेने २० व २१ जुलै २०२२ रोजी या इमारतींतील रहिवास नसलेल्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर पोलीस बंदोबस्तात निष्कासन कारवाई केलेली होती. शिवाय या इमारतीतील काही सदनिका सील बंदही केल्या होत्या.दरम्यानच्या काळात नगररचना विभागामार्फत खातरजमा केल्यानंतर या इमारती बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्रभाग समिती ‘सीॠच्या सहाय्यक आयुक्तांनी मे. रुंद्राश रिअलटर्सचे विकासक व जागा मालक दिलीप बेनवंशी यांच्याविरोधात एमआरटीपी व बनावट कागदपत्रे बनवून नागरिकांची आणि महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वसई-विरार महापालिकेच्या याच कारवाईचा धागा पकडूनच विरार पोलिसांनी बनावट रेरा, दस्त नोंदणी करून इमारती बांधल्याचे प्रकरण उजेडात आणले होते. त्यामुळे महापालिका प्रभागांतर्गत बांधकाम झालेल्या इतर इमारतींचे त्वरित सर्वेक्षण करून संबंधित अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांविरोधात एमआरटीपी व फौजदारी कलमांतर्गत तात्काळ गुऩ्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

- Advertisement -

त्यानुसार वसई-विरार महापालिकेने तक्रारी केल्यानंतर वालीव, आचोळे आणि विरार पोलीस ठाण्यांत पाच वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. अधिकच्या माहितीत वसई-विरार महापालिकेच्या मौजे आचोळे सर्व्हे क्रमांक-२२ ते ३४ या मधील डम्पिंग ग्राउंड ४५१ व एसटीपी ४५० करता आरक्षित असलेल्या खासगी जमीन व सरकारी मालकीच्या जमिनीचे खोटे दस्तावेज बनवण्यात आल्याचे उजेडात आल्याने पोलिसांनी फसवणूक झालेल्या व्यक्तींना लेखी तक्रार करण्याचे आवाहन केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -