घरपालघरकर गैरव्यवहारातील संशयिताची आत्महत्या

कर गैरव्यवहारातील संशयिताची आत्महत्या

Subscribe

याबाबत विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पालघरः वाडा नगरपंचायतीच्या मालमत्ता कराच्या वसुलीदरम्यान बनावट पावती बुकांच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या गैरप्रकारातील संशयित असणार्‍या विष्णू हडळ (४५) या नगरपंचायत कर्मचार्‍याने बुधवारी सायंकाळी आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी मालमत्ता कराच्या वसुलीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे मुख्य अधिकारी अजय साबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधितांना पोलीस ठाण्यामध्ये नेऊन त्यांना समज दिली होती. गैरमार्गाने वसूल केलेली मालमत्ता कराची रक्कम नगर परिषदेमध्ये भरणा करण्यास व त्या संदर्भात तपशील देण्यासाठी मुख्याधिकारी अजय साबळे यांनी २४ तासांची मुदत दिली होती. दरम्यान, बुधवारी हा कालावधी उलटल्यानंतर रकमेचा भरणा न झाल्याने मुख्याधिकारी साबळे तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेत असताना हडळ यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -