घरपालघरचांगल्या आरोग्यासाठी आजी-आजोबांचा आहार घेण्याची गरज

चांगल्या आरोग्यासाठी आजी-आजोबांचा आहार घेण्याची गरज

Subscribe

फुलांचे सुगंध आनंदाचे हार्मोन्स वाढवतात. ओवा, काळिमिरी, नागरमोथा, वाळा ,वेखंड शरिरासाठी अतिशय उपयुक्त असून त्याचे नियमित सेवन केले पाहिजे, असेही डॉ. राऊळ यांनी पुढे बोलताना सांगितले.

वसई : आजकाल गावोगावी डायलिसिस केंद्रे वाढत असून तरुणांनाही डायलेसिस करावे लागत आहे. हे चांगले चिन्ह नाही. कुठे तरी काही चुकते आहे. त्यासाठी आहार संस्कृती महत्वाची असून आपल्या आजी-आजोबांचा आहार आपण घेतला पाहिजे, असा सल्ला मुंबई महापालिकेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी विरार येथे बोलताना दिला.
वनिता विहार महिला मंडळाच्या अमृत महोत्सवी समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना डॉ. राऊळ यांनी हा सल्ला दिला. यावेळी प्रथम महिला महापौर प्रवीण ठाकूर, आयटी तज्ञ दिपा राऊत यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. गहू दलिया स्वरुपात खावा. ज्वारी, बाजरी, नाचणी ही भरड धान्ये , खसखस, डिंक, तांदळाचे जात्यावरील पीठ खावे. फुलांचे सुगंध आनंदाचे हार्मोन्स वाढवतात. ओवा, काळिमिरी, नागरमोथा, वाळा ,वेखंड शरिरासाठी अतिशय उपयुक्त असून त्याचे नियमित सेवन केले पाहिजे, असेही डॉ. राऊळ यांनी पुढे बोलताना सांगितले.

चार महिलांनी एकत्र आल्यावर गॉसिप करण्यापेक्षा समाजसेवा करणे चांगले. उद्योग-व्यवसाय करा. शेती हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. सर्व जगातून भारतात गुंतवणूक केली जात असून पॉझिटिव्ह दृष्टीकोन ठेवावा. एथिकल बिझनेस करावा. आर्थिक व्यवहाराकडे स्वतः लक्ष द्या. कुणावरही विश्वास ठेवू नका. वेगवेगळ्या योजना आहेत. काही योजनांमध्ये वयाची अट नाही, अशी माहिती दिपा राऊत यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

वनिता विहार महिला मंडळाचा वटवृक्ष झाला असून एखादी संस्था सातत्याने वाढवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याकाळी विरारसारख्या खेडे गावात क्रांतिकारी विचारांच्या महिला होत्या. ही अभिमानाची गोष्ट आहे. न करताही पैशांची साठवणूक व गुंतवणूक कशी करावी हे महिलांना साधते. आजच्या युगात सुखसुविधा आहेत, पण मनःशांती नाही. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी आध्यात्मिक व्हावे, असे प्रतिपादन प्रथम महापौर प्रवीणा ठाकूर यांनी आपल्या भाषणात केले.
वनिता विहार महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा वर्तक, माजी अध्यक्षा चंपा मांगेला ,उल्का चोरघे, पिरोज सावे, सचिव हर्षला राऊत, दीप्ती पाटील यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य सभासदांनी अमृत महोत्सवी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी कार्यक्रमासाठी विनामूल्य हॉल उपलब्ध करुन दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -