घरठाणेपुरस्कार आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पुरस्कार आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Subscribe

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची मागणी

 नवी मुंबई ,खारघर येथे १६ एप्रिल रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, या पुरस्काराच्या आयोजकांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विधी सेलने केली आहे. अन्यथा नवीमुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयासमोर तीव्र निषेध व्यक्त केला जाईल असा इशारा ही दिला आहे.  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विधी सेलचे अध्यक्ष ऍड मोहम्मद झिया आणि ठाणे विधी सेल अध्यक्ष ऍड विशाल बोऱ्हाडे यांनी नवीमुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वरील मागणी केली आहे. त्यामध्ये नवी मुंबई येथील खारघर येथील कॉरपरेट मैदानावर महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्तम पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा १६ एप्रिल २०२३ रोजी सपंन्न झाला. या कार्याक्रमात देशाचे गृहराज्य मंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन प्रचंड असा जनसमुदाय उपस्थित होता.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्तम पुरस्कार असुन हा पुरस्कार याआधी बंदिस्त हॉलमध्ये होत असे मात्र राजकीय पोळी भाजण्यासाठी हा पुरस्कार प्रथमच मोकळया मैदानात आयोजित करण्यात आला. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र सरकारने कोटयावधी रुपये खर्च केले, मात्र एवढे पैसे खर्च करून सुध्दा कार्यक्रमाच्या ठिकाणी अपुऱ्या सुविधाची उणीव होती, या कार्यक्रमाच्या अपुऱ्या सुविधांमुळे तसेच निष्काळजापणामुळे रखरखत्या उन्हात १३ जणांचा मृत्यु झाला, तसेच अनेक लोक गंभीर झाले आहेत आणि राज्याच्या पुरस्काराला गालबोट लागले. जनतेच्या खिशाला कात्री लावुन कर स्वरुपात वसुल केलेली कोटयावधी रक्कम या कार्यक्रमास आयोजकांनी वापरली. मात्र उपस्थित जनतेला करदात्यालाच या कार्यक्रमात अपुऱ्या सुविधांमुळे व आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे प्राण गमवावे लागले. त्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन समिती यांची विशेष समितीद्वारे चौकशी करावी व त्यांच्यावर भादवी कलम ३०४, ३०८, ३३६, ३३७, ३३८, ११४ नुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे नमूद केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -