घरपालघरवसुबारसच्या दिवशीच गोवंशांना वाचवण्यात पोलिसांना यश

वसुबारसच्या दिवशीच गोवंशांना वाचवण्यात पोलिसांना यश

Subscribe

. याबाबत पालघर पोलीस ठाण्यात ३०७,३३२,३३८,४६८,४७१,२८२,४२५ व १८४ भा.द.स. कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींना शोधण्याचे कार्य सुरू आहे. या प्रकरणात अधिक तपास पालघर पोलीस करीत आहे.

पालघर: पालघर -मनोर रस्त्यावर मनोर भागात आज गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी पालघर पोलिसांनी जीवाची बाजी लावून वसुबारसच्या दिवशीच गोवंशाना वाचवण्यात यश प्राप्त केले आहे. यादरम्यान पालघर पोलिसांकडून दोन गोतस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.तर दोघे जण फरार आहेत. तसेच या कारवाईत पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहे.या कारवाईत ४ गोवंशांना वाचवण्यात पालघर पोलिसांना यश आले असून विशेष म्हणजे पोलिसांना हे यश वसुबारसच्या दिवशीच मिळाल्याने पालघर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत पालघर पोलीस ठाण्यात ३०७,३३२,३३८,४६८,४७१,२८२,४२५ व १८४ भा.द.स. कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींना शोधण्याचे कार्य सुरू आहे. या प्रकरणात अधिक तपास पालघर पोलीस करीत आहे.

पालघर पोलिसांना गुप्त महितीदारांकडून माहिती मिळाली होती, की पालघरमध्ये मनोर भागात काही गो तस्कर गोवंशाची तस्करी करणार आहेत. त्या माहितीच्या आधारे पालघर पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी पहाटे पालघर मनोर रस्त्यावर नाकाबंदी केली होती. यावेळी येणार्‍या- जाणार्‍या सर्व वाहनांची तपासणी केली जात असताना पोलिसांना एक संशयित इनोव्हा कार दिसून आली. इनोव्हा कारला पोलिसांकडून थांबण्याकरिता सांगण्यात आले. परंतु कारमधून गोवंशाची अवैध तस्करी करणार्‍या आरोपींनी नाकाबंदी दरम्यान लावण्यात आलेली बॅरिकेड उडवून फरार होण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले. तरी पोलिसांनी इनोव्हा कारला थांबवण्यात यश मिळवले. परंतु इनोव्हा कारमधील ४ तस्करांपैकी २ तस्कर फरार झाले असून २ तस्करांना पकडण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -