घरपालघरबेशुद्ध अवस्थेत पत्नीला रूग्णालयात दाखल केले,पण अखेर बिंग फुटले

बेशुद्ध अवस्थेत पत्नीला रूग्णालयात दाखल केले,पण अखेर बिंग फुटले

Subscribe

बोईसर दांडी पाडा एकोडेंट सिटीमध्ये महिला कृताली पाटील तिच्या चार वर्षांच्या मुलगा, पती आणि सासू सोबत राहत होती.उर्वरित पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे.बी.अहिराव करीत आहेत.

पालघर: वेळ शनिवारी सकाळी 8 वाजताची. बोईसरच्या टिमा शासकीय रुग्णालयात कनिष्क पाटील हा आपली पत्नी कृताली पाटीलला घेऊन आला.ती त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत होती. तेथे उपस्थित डॉ. मनोज शिंदे यांनी त्यांच्या पथकासह महिलेला दाखल केले. त्यांनी पाहणी केली असता महिलेच्या अंगात हालचाल दिसून आली नाही.तपासणीअंती कृताली ही मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. धक्कादायक म्हणजे तिच्या मानेवर खुणा दिसल्यानंतर पोलिसांना पाचारण करून महिलेचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. तारापूरमध्ये महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असता, अहवालात धक्कादायक खुलासे झाले.कृताली पाटील हिचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले.त्यानंतर बोईसर पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे कनिष्क पाटील विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपी कनिष्क पाटील याने गुन्ह्याची कबुली दिली. कृताली बाहेर खासगी नोकरी करायची. शनिवारची सकाळ तिच्या आयुष्यातील शेवटची सकाळ ठरली.माहिती प्राप्त नुसार. बोईसर दांडी पाडा एकोडेंट सिटीमध्ये महिला कृताली पाटील तिच्या चार वर्षांच्या मुलगा, पती आणि सासू सोबत राहत होती.उर्वरित पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे.बी.अहिराव करीत आहेत.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -