घरपालघर...तर महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाला काँग्रेस ठोकणार टाळे

…तर महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाला काँग्रेस ठोकणार टाळे

Subscribe

याची संपूर्ण जबाबदारी ही आय प्रभाग समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची राहील, असा इशारा यावेळी अल्मेडा यांनी दिला.

वसईः वसई- विरार महापालिकेच्या प्रभाग समिती आयमधील कार्यालयात भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार सुरु आहे,असा आरोप करीत २८ ऑगस्टपर्यंत समस्यांचे निराकरण झाले नाही तर २९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता प्रभाग समिती आय कार्यालयाला टाळे लावले जाईल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. महापालिकेच्या आय प्रभागातील नागरी समस्या, जनतेला होणारा त्रास, असुविधा, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून दिली जाणारी हिण वागणूक या व इतर सर्व प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी वसई -विरार शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांनी काँग्रेस पक्षाच्या शिष्ट मंडळासोबत आय प्रभाग कार्यालयात बैठक घेतली. यात आय प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोंसालवीस यांच्यासह बांधकाम, दिवाबत्ती, आरोग्य, पाणी पुरवठा, वृक्ष प्रधिकारण, कर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. २८ ऑगस्ट २०२३ पर्यंत जनतेच्या समस्यांचे निवारण झाले नाही आणि काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या अर्जावर कारवाई होऊन जनतेला त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळाल्या नाही तर २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आय प्रभाग समिती कार्यालयास टाळेबंद आंदोलन करण्यात येईल.

याची संपूर्ण जबाबदारी ही आय प्रभाग समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची राहील, असा इशारा यावेळी अल्मेडा यांनी दिला. सरचिटणीस किरण शिंदे, वसई शहर ब्लॉक अध्यक्षा बिना मायकल फुर्ट्याडो, रॉईस फरेल, मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष व्हेलेनटाईन मिर्ची, आनंद चव्हाण, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष डेरीक फुर्ट्याडो, महिला जिल्हाध्यक्षा प्रविणा चौधरी, नवीन साळगावकर,विद्याधर मोरे, असिफ खान, सलीम खिमाणी,शैलेश चोडणकर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -