घरपालघरराज्यात असेही एक देवस्थान,वर्षातून दोनदा होते भाविकांना दर्शन

राज्यात असेही एक देवस्थान,वर्षातून दोनदा होते भाविकांना दर्शन

Subscribe

पद्मावती देवीची मूळ मूर्ती सूंदर व रेखीव असून काळ्या पाषाणापासून घडवलेली आहे. वर्षभर ती जमिनीखाली भुयारात एका लादीखाली सुरक्षित ठेवली गेलेली असते.

वसईः वसईतील नाळे गावातील भुमीगत पद्मावती देवी म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. वर्षातून दोनवेळा भाविकांच्या दर्शनासाठी जमिनीखालील भुयारातून निद्रावस्थेतून बाहेर येणार्‍या देवीच्या दर्शनासाठी भक्तजन चातकासारखी वाट पहात असतात. रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी पद्मावती देवी भाविकांच्या दर्शनासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जागी करण्यात येणार आहे,अशी माहिती मंदीर प्रशासनाने दिली. पश्चिम किनारपट्टीवरील जागृत देवी असलेल्या सात बहीणींपैकी पद्मावती ही एक असून तिचे मूळ स्थान नाळे गावातील नारळ,सुपारी व केळींच्या दाट वाडीमध्ये आहे. पद्मावती देवीची मूळ मूर्ती सूंदर व रेखीव असून काळ्या पाषाणापासून घडवलेली आहे. वर्षभर ती जमिनीखाली भुयारात एका लादीखाली सुरक्षित ठेवली गेलेली असते.

वर्षातून दोनवेळा नवस किंवा इतर धार्मिक कार्यासाठी ती बाहेर काढतात. सकाळी सुर्योद्यानंतर देवी जागी करून मंदिरापासून हाकेच्या अंतरावर दर्शनासाठी बनवलेल्या मंडपात ठेवण्यात येते. देवीच्या मूळ मूर्तीवर पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार मुखवटा लावला जातो. साजश्रुंगार करून देवीला साडी-चोळी नेसवून दागदागिन्यांनी मढवले जाते. देवी जागी केली जाते तो दिवस गावकरी सणासारखा साजरा करतात. देवीपुढे दिवसभर खणानारळ व ओट्या घेवून नवसपूर्ती व दर्शनासाठी भक्तगण येत असतात. दिवसभर मनोभावे देवीची पूजाअर्चा झाली की सुर्यास्त होण्याअगोदर देवीला पुन्हा मंदिरातील छोट्या भुयारात ठेवतात. त्यानंतर पुन्हा त्यावर लादी ठेऊन बंदिस्त केले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -