घरपालघरमीरा-भाईंदर पालिकेकडून दोन आदर्श रस्ते तयार

मीरा-भाईंदर पालिकेकडून दोन आदर्श रस्ते तयार

Subscribe

मनपा आयुक्त दिलीप ढोले ह्यांनी अधिक रहदारी असणार्‍या रस्त्यांचे रूप पालटून ते आदर्श रस्ते निर्माण करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार दोन आदर्श रस्ते तयार करण्यात आले आहेत.

इरबा कोनापुरे,भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाकडून शहरात दोन आदर्श रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये भाईंदर पश्चिमेचा मुर्धा ते उत्तन व घोडबंदर येथील जेपी इन्फ्रा या दोन रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्या लगतच्या भिंतीची रंगरंगोटी, चौक सुशोभीकरण व इतर कामे महापालिकेच्या विविध विभागाकडून केली आहेत . यामुळे रस्त्यांचे रूप पालटले आहे. मीरा-भाईंदरमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत शहराच्या विविध परिसरात ओसाड पडलेल्या भिंतींची रंगरंगोटी केली आहे. या भिंतीवर चित्र रेखाटून स्वच्छता व इतर विषयांवर सामाजिक संदेश देण्यात आला आहे. शहर सुशोभीकरण अभियानांतर्गत शहराच्या विविध भागातील तलावामध्ये कारंजे उभारण्यात येणार आहेत. मनपा आयुक्त दिलीप ढोले ह्यांनी अधिक रहदारी असणार्‍या रस्त्यांचे रूप पालटून ते आदर्श रस्ते निर्माण करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार दोन आदर्श रस्ते तयार करण्यात आले आहेत.

मुर्धा ते उत्तन हा २.५ किमी व जेपी इन्फ्रा इमारतीसमोर असणार्‍या १ किमीच्या रस्त्याची पहिल्या टप्यात निवड अधिकार्‍यांकडून केली आहे . राई-मुर्धा मार्गावरून मुंबई व इतर परिसरातील पर्यटक हे उत्तन व गोराई समुद्रकिनार्‍यावर जातात .यासह उत्तन मधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व न्यायिक अकादमीमध्ये विविध कार्यक्रमानिमित्त केंद्रीय मंत्री व न्यायाधीश व इतर नामांकित व्यक्ती या मार्गावरून येत जात असल्याने या रस्त्याची निवड करण्यात आली आहे . या व्यतिरिक्त जेपी इन्फ्रा रस्त्यावर नागरिक रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर फिरण्यासाठी येतात . तसेच या रस्त्यालगत सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असल्याने याची निवड करण्यात आली आहे. या रस्त्यावर असणार्‍या भिंतींची रंगरंगोटी, तलावांचे सुशोभीकरण ,झाडांची रंगरंगोटी, झाडांची छाटणी, नवीन झाडांची लागवड, नागरिकांना बसण्यासाठी बाक, खेळाचे साहित्य , विद्युत रोषणाई इत्यादी कामे केली जात आहेत. ही कामे उद्यान , सार्वजनिक बांधकाम व विद्युत विभागाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन मनपा उपायुक्त संजय शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -