घरपालघरवाड्यातील जलशुद्धीकरण यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरु

वाड्यातील जलशुद्धीकरण यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरु

Subscribe

या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याने प्रकल्प कार्यान्वित केला गेला नाही. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात येथील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागले होते.

वाडा: जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला होता. मात्र या यंत्रणेसाठी पुरेसा विद्युत पुरवठा नसल्याने हा प्रकल्प सुरु करता आला नव्हता. काही राजकीय पक्ष, संघटना, नागरिक यांची ओरड सुरु होताच नगरपंचायत प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर गेल्या आठवड्यात हा प्रकल्प सुरु केल्याने वाडा शहरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी दोन वर्षांपूर्वी येथील कोकाकोला नामांकित कंपनीने जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सीएसआरमधून 1कोटी 20 लाख रुपयांचा निधी दिला. या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याने प्रकल्प कार्यान्वित केला गेला नाही. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात येथील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागले होते.

या ठिकाणी लागणारा पुरेसा विद्युत पुरवठा करण्यात येऊन जलशुद्धीकरण यंत्रणा तातडीने सुरु करण्यात यावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्ष, संघटना, नागरिकांनी केली होती. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या विषयी आंदोलन छेडले होते. येत्या पंधरवड्यात प्रकल्प सुरु न झाल्यास नगरपंचायती समोरच मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर नगरपंचायत प्रशासनाने प्रयोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरु केला असून शुद्धीकरण होत असलेल्या पाण्याच्या चाचण्या, विजेचा दाब, दररोज शहराला लागणारे पाणी शुद्धीकरण करण्याची क्षमता या सर्व बाबींची पडताळणी सुरु केली आहे. या सर्व पडताळणी नंतरच कोकाकोला कंपनी प्रशासन, नगरपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाईल, असे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

जनहिताचे प्रश्न घेऊन आम्ही नेहेमीच आंदोलन छेडत असतो. येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.
कांतीकुमार ठाकरे , तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाडा तालुका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -