घरपालघरwatermelon:उन्हाच्या कडाक्याला लाल लाल कलिंगडचा उतारा

watermelon:उन्हाच्या कडाक्याला लाल लाल कलिंगडचा उतारा

Subscribe

उन्हाळ्यात गोड आणि लालभडक गर असलेले कलिंगड सर्वांनाच आकर्षित करते. परंतु बाजारातील रासायनिक फळांपासूनही सावधान राहिले पाहिजे.

जव्हार: निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण जव्हार ही ओळख वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षांपासून बदलत चालली आहे. या भागात झालेली जमिनीची धूप , वणवे या मुळे येथील वनसंपदा धोक्यात आली. याचा परिणाम येथील थंड हवामानावर होऊन उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे, यावर उपाय म्हणून नागरिकांनी स्वस्त आणि मस्त अशा लाले लाल अशा कलिंगडाला पसंती दिली जात आहे. प्रत्येक हंगामातील येणारी फळे ही शरीराला अतिशय पोषक असतात. मात्र उन्हाळ्यात इतर हंगामाच्या तुलनेत शरीराला पाण्याची गरज अधिक असते. ती गरज रसभरीत फळे जसे कलिंगडाने भरून निघू शकते असे तज्ज्ञांकडून नेहेमी सांगण्यात येते. फळांची उपलब्धता, शारीरिक क्षमता आणि वेळ यानुसार फळे ग्रहण करावीत. उन्हाळ्यात गोड आणि लालभडक गर असलेले कलिंगड सर्वांनाच आकर्षित करते. परंतु बाजारातील रासायनिक फळांपासूनही सावधान राहिले पाहिजे.

सध्या जव्हार शहरातील बाजारपेठांमध्ये कलिंगड विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता रासायनिक प्रक्रियेमुळे बारा महिने फळे उपलब्ध होतात. तरीही त्या-त्या समप्रमाणात फळे बाजारात येतात. सध्या ४० ते ८० रुपयांपर्यंत कलिंगडची विक्री सुरू आहे. लालभडक गर आणि चवीला गोड असलेले कलिंगड उन्हाळ्यात शरीराला उत्तम आहे. परंतु बाजारातील कलिंगड रसायनयुक्त तर नाही ना? ही शंका निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये फळे खाण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे.

- Advertisement -

कलिंगड हे फळ उन्हाळ्यात शरीरातील पाणी वाढविते. शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी एक ठराविक मात्रापर्यंत रासायनिक खत वापरतो. परंतु कलिंगडमध्ये गोडवा अथवा लालसरपणा आणण्यासाठी काही करीत नाही. मात्र व्यापारीवर्ग कलिंगड टिकविण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया करतात. त्यामुळे ग्राहकांनी कलिंगड खरेदी करताना नीट चौकशी करावी.

– सुरेश पाटील, शेतकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -