घर पालघर घोडबंदर येथे नवीन अग्रिशमन केंद्राचे काम प्रगतीपथावर

घोडबंदर येथे नवीन अग्रिशमन केंद्राचे काम प्रगतीपथावर

Subscribe

सहा महिन्यात या केंद्राचे काम पूर्ण होणार असून त्यासाठी ६ कोटी ८० लाखांचा खर्च येणार आहे.

भाईंदर :- मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या नागरिकरणाला महापालिका नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत आहे. या वाढत असलेल्या लोकवस्त्यांमध्ये संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने घोडबंदर येथे नवीन अग्रिशमन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घोडबंदर येथे सुरू असलेले अग्निशमन केंद्र आठवे असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. सहा महिन्यात या केंद्राचे काम पूर्ण होणार असून त्यासाठी ६ कोटी ८० लाखांचा खर्च येणार आहे.

मीरा -भाईंदर शहरात महापालिकेची सर्व भागात मिळून सात अग्निशमन केंद्रे आहेत. तसेच यापूर्वी मीरा भाईंदर नगरपालिका असताना शहरात भाईंदर पश्चिमेला एकच अग्निशमन केंद्र होते. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येनुसार नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर मीरारोड येथील सिल्वर पार्क येथे दुसरे अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर उत्तन, भाईंदर पूर्वेकडील नवघर, मीरारोड येथील कनाकीया व पेणकर पाडा येथे नवीन केंद्रे सुरू करण्यात आली. तर भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्क येथे सातवे केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता आठवे अग्निशमन केंद्र घोडबंदर येथे निर्माण करण्यात येत आहे. हे निर्माण होत असलेले प्रशस्त अग्निशमन केंद्र पुढील वर्षी अग्निशमन विभागाच्या ताफ्यात समाविष्ट होणार असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

 

ट्रक टर्मिनलच्या आरक्षित भूखंडावर केंद्र

- Advertisement -

हे अग्निशमन केंद्र घोडबंदर येथील ट्रक टर्मिनलच्या आरक्षित भूखंडावर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ६८९ चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी एक मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीमधील तळ मजल्यावर स्टोअर रूमसह कंट्रोल रूम, कर्मचार्‍यांसाठी शौचालय व केंद्रातील वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. तर पहिल्या मजल्यावर प्रशासकीय दालनांची निर्मिती केली जाणार आहे. घोडबंदर येथे केंद्र सुरु झाल्यामुळे घोडबंदर परिसरात मोठ मोठ्या इमारतींचे काम सुरू आहे. त्या भागात याचा मोठा फायदा होणार आहे. तर काजूपाडा ते काशिमीरा या भागात देखील मोठी लोकवस्ती वाढत आहे. येथील नागरिकांना तसेच बांधकामांना आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या नवीन केंद्राचा फायदा होणार आहे.

- Advertisment -