घरमहाराष्ट्रJalna Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी माफी मागायला नको होती; अजित पवारांच्या...

Jalna Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी माफी मागायला नको होती; अजित पवारांच्या वक्तव्याने वाद चिघळणार?

Subscribe

Jalna Lathi Charge : मराठा आरक्षणासाठी जालना (Jalna) येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात (Jalna Lathi Charge)  आल्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) वातावरण तापले होते. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे मी सरकारच्या वतीने क्षमा मागतो, असे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी केले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला नको होती, असे वक्तव्य आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगावमध्ये होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. (Jalna Lathi Charge Devendra Fadnavis should not have apologized Ajit Pawars statement will inflame the controversy)

मराठा आरक्षणासाठी मागच्या 15 दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. मात्र आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी जमावाने दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे म्हटले होते. त्यामुळे मराठा समाज याप्रकरणी प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे अखेर लाठीचार्ज घटनेच्या तीन दिवसांनी सरकारला या घटनेवर भाष्य करावं लागलं होते.

- Advertisement -

हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांशी अधिकृतपणे चर्चा व्हावी, एजंटच्या माध्यमातून नाही; राऊतांचा राज्य सरकारला टोला

सरकारकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, जालन्यातील घटना ही चुकीची असून जालन्यात निष्पाप नागरिकांवर जो बाळाचा वापर झाल्याने जी इजा झाली. त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. या प्रकरणाची मुख्यमंत्री ही उच्चस्तरीय चौकशी करणार आहेत. या घटनेतील दोषींवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. या घटनेवर कोणी राजकारण करू नये, असेही आवाहन केले होते.

- Advertisement -

आज जळगावमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागण्याची काही आवश्यकता नव्हती. आंतरवाली सराटी गावात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. पोलिसांनी तो निर्णय घेत लाठीचार्ज केला होता. पोलिसांनी चूक केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागयला नको होती, असं अजित पवार म्हणाल आहेत.

हेही वाचा – सौदी राजकुमाराच्या वक्तव्याने पाकिस्तानचे टेंशन वाढले; भारताविरोधी भूमिका बदलणार?

मराठा समाजाला लवकरच मिळणार आरक्षण

दरम्यान, मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलवत पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. त्यामुळे सरकारला एक महिन्यांचा वेळ द्यायला हवा. पण, आपण आंदोलन मागे घेणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत जागेवरुन हटणार नाही, मी माझ्या घराच्या उंबऱ्यालाही शिवणार नाही, अशी भूमिकाही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -