घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार १३ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : बुधवार १३ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : प्रगतीचा नवा टप्पा तुम्हाला गाठता येईल. आता वेळेला महत्त्व द्या. महत्त्वाची कामे करा. केस जिंकाल.

वृषभ : तजडोड केल्यास समस्या गंभीर स्वरूप धारण करणार नाही. नोकरी टिकवा. उदास होऊ नका. यश मिळेल.

- Advertisement -

मिथुन : विरोधकांना न दुखावता काम करा. हुशारी वापरा. वाहन जपून चालवा. कामात क्षुल्लक अडचण येईल.

कर्क : आज कठीण काम करता येईल. आळस करू नका. घरातील व्यक्तीला कमी लेखू नका. नम्र रहा.

- Advertisement -

सिंह : तुम्ही स्पर्धा जिंकल्याने तुमचे महत्त्व वाढेल. जुने येणे वसूल करा. नवीन वस्तूंची खरेदी कराल.

कन्या : महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. पदाची मागणी करण्यापेक्षा कार्यावर भर द्या. यश मिळेल.

तूळ : जास्त भावनावश व्हाल. मौल्यवान खरेदी कराल. खाण्याची चंगळ होईल. वेगळाच अनुभव घ्याल.

वृश्चिक : जीवनाला कलाटणी मिळेल. नवे कार्य आरंभ कराल. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळेल. खंबीर व्हाल.

धनु : क्षुल्लक कारणाने वाद होईल. दुखापत होऊ शकते. रस्त्याने चालताना, काम करताना काळजी घ्या.

मकर : नोकरीत महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वरिष्ठांची मर्जी पाहूनच तुमचे मत व्यक्त करा. यश जिद्दीने मिळेल.

कुंभ : किरकोळ कारणाने मन विचारात पडेल. तुम्ही नित्य नियमाने काम करत रहा. यश मिळेल.

मीन : धंद्यात नवा पर्याय मिळेल. स्पर्धेत प्रगती कराल. नोकरीत मनाप्रमाणे यश मिळेल. थकबाकी वसूल करा.

- Advertisment -