घरताज्या घडामोडीMumbai Weather : मुंबईकरांनो सावधान! येत्या 36 तासांत समुद्रात 5 मीटरपेक्षा जास्त...

Mumbai Weather : मुंबईकरांनो सावधान! येत्या 36 तासांत समुद्रात 5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार

Subscribe

मुंबईला वेढणाऱ्या समुद्रात आगामी ३६ तासांच्या कालावधीत भरतीच्या वेळी अंदाजे ५ मीटर पेक्षाही जास्त उंचीच्या मोठ्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मच्छीमार, कोळी यांनी समुद्रात बोटीने जाणे अथवा समुद्र किनारी पर्यटकांनी, नागरिकांनी कोणीही जावू नये. त्यामुळे जीविताला धोका उद्भवू शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेने ' भारतीय हवामानशास्र विभाग' (IMD) आणि 'इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस' यांच्या हवाल्याने मुंबईकरांना दिला आहे.

मुंबई : मुंबईला वेढणाऱ्या समुद्रात आगामी ३६ तासांच्या कालावधीत भरतीच्या वेळी अंदाजे ५ मीटर पेक्षाही जास्त उंचीच्या मोठ्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मच्छीमार, कोळी यांनी समुद्रात बोटीने जाणे अथवा समुद्र किनारी पर्यटकांनी, नागरिकांनी कोणीही जावू नये. त्यामुळे जीविताला धोका उद्भवू शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेने ‘ भारतीय हवामानशास्र विभाग’ (IMD) आणि ‘इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस’ यांच्या हवाल्याने मुंबईकरांना दिला आहे. मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. पालिकेने आपली आपत्कालिन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. अग्निशमन दल, नौदल, पोलीस यांनाही अलर्ट करण्यात आले असल्याचे समजते. (mumbai weather forecast imd alert for high tide in arabian sea)

मुंबई महापालिका आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, भारतीय हवामानशास्र विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस (INCOIS) यांनी, शनिवारी सकाळी ११.३० वाजेपासून ते रविवार ५ मे रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अंदाजे ५ मीटर पेक्षाही अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

- Advertisement -

महापालिकेच्य इशाऱ्यानुसार, समुद्रात आगामी ३६ तासांत भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या नेहमीच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८.५३ वाजता समुद्राला भरती होती. यावेळी समुद्रात ३.५८ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तर, शनिवारी दुपारी २.३६ वाजता ओहोटी असल्याने समुद्रात लाटांची उंची १.४० मीटर असणार आहे. मात्र रात्री ९.०९ वाजता समुद्रात मोठी भरती असून त्यावेळी समुद्रात ४.०८ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे पालिकेने दिलेल्या माहितीनुसार लाटांची उंची किमान ०.५ ते १.०५ मीटरने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने प्रत्यक्षात त्यावेळी समुद्रात किमान ५.५८ मीटर एवढ्या उंचीपर्यंत लाटा उसळण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

रविवार ५ मे रोजी मध्यरात्री ३.३० वाजता ओहोटी असल्याने समुद्रात १.०५ मीटर उंचीच्या लाटा असतील. मात्र सकाळी ९.५० वाजता समुद्रात ४.०४ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. परिणामी या लाटांची उंची १.५ मिटरने वाढल्यास समुद्रात प्रत्यक्षात ५.५४ मिटर उंचीच्या लाटा उसळतील. त्याचप्रमाणे दुपारी ३.३५ वाजता समुद्रात ओहोटी असल्याने समुद्रातील लाटांची उंची १.३२ मिटर इतकी असणार आहे. मात्र रात्री ९.५६ वाजता समुद्रात ४.२४ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. परिणामी त्या लाटांची उंची १.५ मीटरने वाढून प्रत्यक्षात ५.७४ मिटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत.

परिणामी, येत्या ३६ तासांत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

समुद्रात नेहमीपेक्षा ०.०५ ते १.५ मीटर अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा लक्षात घेता, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्त यांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस, महापालिका आपत्कालिन यंत्रणा, वार्ड स्तरीय यंत्रणा, अग्निशमन दल, लाईफ गार्ड, नौदल आदी यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

मच्छीमार, पर्यटकांना समुद्रात जाण्यास बंदी

समुद्रात आगमी ३६ तासात मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असल्याने पालिका सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांनी मच्छीमार, पर्यटक, नागरिक यांना समुद्रात जाण्यापासून रोखावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. विशेषतः उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवास असलेल्या नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असे देखील आवाहन करण्यात आले आहे. तसेच, किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना या कालावधीत किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून उसळणाऱ्या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही, समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

३६ तास डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याचे आव्हान

या ३६ तासांच्या कालावधीत समुद्रातील हालचालींवर, घडणाऱ्या घडामोडींवर, संपूर्ण परिस्थितीवर मुंबई महापालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून असणार आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी या कालावधीत घाबरून न जाता दक्ष राहावे, समुद्रात जावू नये. तसेच समुद्र किनारी तैनात असलेले महापालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

समुद्रात ३६ तासांत भरती व ओहोटीची माहिती

४ मे

  • समुद्रात भरती -: सकाळी ८.५३ वाजता ३.५८ मीटर उंच लाटा उसळणार
  • ओहोटी -: दुपारी २.३६ वाजता, लाटांची उंची १.४० मीटर
  • समुद्रात भरती -: रात्री ९.०९ वाजता ४.०८ मीटर उंच लाटा उसळणार

५ मे

  • ओहोटी -: मध्यरात्री ३.३० वाजता, लाटांची उंची १.०५ मीटर
  • समुद्रात भरती -: सकाळी ९.५० वाजता ४.०४ मीटर उंच लाटा उसळणार
  • ओहोटी -: दुपारी ३.३५ वाजता, लाटांची उंची १.३२ मीटर
  • समुद्रात भरती -: रात्री ९.५६ वाजता ४.२४ मीटर उंच लाटा उसळणार

हेही वाचा – Maharashtra Weather : राज्यात काही भागांत अवकाळी पाऊस तर, मुंबई, ठाणे, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -