घरफोटोगॅलरीPHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या...

PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा

Subscribe

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) 17व्या पर्वात मोटेरा स्टेडियमवर रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्समध्ये सामना रंगला. विल जॅकच्या 41 चेंडूत नाबाद 100 धावांच्या आक्रमक खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चार षटके शिल्लक ठेवत गुजरात टायटन्सचा नऊ विकेट राखून पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करत तीन विकेट्स गमावून 200 धावा केल्या. पण आरसीबीने अवघ्या 16 षटकांत 1 गडी गमावून 206 धावा केल्या आणि 10 सामन्यांतील तिसरा विजय नोंदवला. तर, गुजरातचा 10 सामन्यांमधील हा सहावा पराभव आहे.

- Advertisement -

आरसीबीच्या विल जॅकने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार शतक झळकावताना त्याने ख्रिस गेलचा एक विक्रमही मोडला.

- Advertisement -

विल जॅकला 50हून 100 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 10 चेंडू लागले. 2013मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलने 13 चेंडूत हा पराक्रम केला होता.

या यादीत विराट कोहलीचाही समावेश आहे. कोहलीने 50हून 100 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी 14 चेंडू लागले होते.

पहिल्या 17 चेंडूत केवळ 17 धावा करणाऱ्या जॅकने आपल्या नाबाद शतकी खेळीत पाच चौकार आणि 10 षटकार ठोकले.

 

मोहित शर्मा आणि रशीद खान यांच्याविरुद्ध 15व्या आणि 16व्या षटकात जॅकने 29-29 धावा करताना एकूण सात षटकार आणि तीन चौकार मारले.


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -