घररायगडरोहे पोलीस ठाण्यात खुनातील आरोपीची आत्महत्या

रोहे पोलीस ठाण्यात खुनातील आरोपीची आत्महत्या

Subscribe

रवी वाघमारे याचे आपल्या पत्नीशी जेवण बनवण्यावरून भांडण झाले होते. यावेळी त्याने रागाच्या भरात लोखंडी कोयत्याने वार करून पत्नी जयश्रीचा खून केला होता. रोहे पोलिसांनी रवीला ११ एप्रिल रोजी अटक केली होती.

रोहे तालुक्यातील शेणवई आदिवासी वाडी येथील आरोपी रवी वसंत वाघमारे याने ९ एप्रिल रोजी पत्नीचा खून केला होता. याप्रकरणी रोहे पोलिसांनी त्याला अटक केली होती. या आरोपीने गुरुवारी पहाटे पोलीस ठाण्यातील कोठडीत आत्महत्या केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासहवरिष्ठ पोलीस अधिकारी रोह्यात दाखल झाले.

रवी वाघमारे याचे आपल्या पत्नीशी जेवण बनवण्यावरून भांडण झाले होते. यावेळी त्याने रागाच्या भरात लोखंडी कोयत्याने वार करून पत्नी जयश्रीचा खून केला होता. रोहे पोलिसांनी रवीला ११ एप्रिल रोजी अटक केली होती. यानंतर न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी पहाटेच्या सुमारास रवीने पांघरुणासाठी दिलेल्या चादरीची किनार फाडून कोठडीमधील शौचालयात गळफास घेतला. घटना उघडकीस येताच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे हे सर्व संबंधित तपास यंत्रणेसह रोह्यामध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शकपणे तपास करणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

रोहे पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून माहिती घेण्याचे काम सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय, मानवाधिकार आयोगाच्या निर्देशानुसार या घटनेचा पंचनामा व पुढील तपास करण्यात येणार आहे. याप्रकरणी निष्पक्ष व पारदर्शक तपास केला जाईल. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा

या घटनेतील मृत आरोपीच्या पत्नीचेही निधन झाले आहे. या दाम्पत्यास चार अपत्ये असून ती १० ते दीड वर्षे वयोगटातील आहेत. तसेच त्यांचे पालनपोषण करण्यास मृत आरोपीच्या वयोवृद्ध आई वडिलांशिवाय अन्य कोणीही नाही. स्थानिकांनी याची जाणीव प्रशासनास करुन दिली असता प्रशासनाने दखल घेत या अनाथ व निराधारांना आवश्यक ती मदत देण्यासंबंधी कारवाई सुरु केली आहे.
– कविता जाधव, तहसीलदार, रोहा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -