घरदेश-विदेशदिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात १३ जण जखमी

दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात १३ जण जखमी

Subscribe

उत्तरप्रदेशातील वारणासी येथील अश्फाक नगर येथील एका साडी कारखान्याला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आता दिल्ली आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील जामिया नगर परिसरातील एका रेस्ट्रॉरंटला आग लागल्याचं समजतं.

उत्तरप्रदेशातील वारणासी येथील अश्फाक नगर येथील एका साडी कारखान्याला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आता दिल्ली आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील जामिया नगर परिसरातील एका रेस्टॉरंटला आग लागल्याचं समजतं. या आगीत १३ जण गंभीर जखमी झाले असून, सिलेंडरच्या स्फोटामुळं ही आग लागल्याचं समजतं. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर करत आहेत.

दिल्लीच्या जामिया नगर परिसरातील एका रेस्टॉरंटला गुरुवार सिलेंडरच्या स्फोटामुळं आग लागली. या आगीत 13 जण जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जामिया नगरमधील एका रेस्टॉरंटच्या तळघरात आग लागली. सिलेंडरचा स्फोट झाल्यानं तेथील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीनं आगीत अडकलेल्यांना बाहेर काढले.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधील वारणसीतील साडी कारखान्यातील साडी फिनिशिंगच्या कामाच्या खोलीत अन्न शिजवत असताना आग लागली. सिलेंडरच्या स्फोटामुळं आग लागल्याचं समजतं. गुरूवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अश्फाक नगर दुर्घटनेची दखल घेतली. तसंच यामध्ये मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती निधीतून चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली.


हेही वाचा – यूपीत कारखान्याच्या आगीत 4 जणांचा मृत्यू; सीएम योगींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -