घररायगडमहापुरानंतर पहिला मजला रिकामा, महाडमध्ये दुकान गाळे, सदनिका विकण्याकडे कल

महापुरानंतर पहिला मजला रिकामा, महाडमध्ये दुकान गाळे, सदनिका विकण्याकडे कल

Subscribe

बाजारपेठेत पुन्हा नवीन नवीन उद्योग सुरू केले जात आहेत. त्यामध्ये खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, कपड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात उघडण्यात येत आहेत. नोकरीनिमित्ताने आलेल्या अनेकांनी ‘गड्या आपला गाव बरा’ असे म्हणत घेतलेल्या सदनिका विकून टाकण्यावर भर दिला आहे.

गेल्या २२ जुलै रोजी शहर आणि परिसरात आलेल्या महापुरामध्ये पाण्याची पातळी कधी नव्हे ती जवळपास २० फुटापर्यंत पोहोचली. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. या महापुरानंतर शहर पुन्हा उभे राहते की नाही, हा प्रश्न होता. मात्र, तरीही मोठ्या धीटाने महाडकर पुन्हा उभे राहिले. अन्य भागातून नोकरीनिमित्त आलेले मात्र इतर इतरत्र जाऊ लागल्याने अनेकांनी पहिल्या मजल्यावरील सदनिका आणि गाळे विक्रीस काढल्याचे ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवरून दिसून येत आहे.

या महापुराने संपूर्ण शहर आणि तालुक्याची कंबरच मोडली. शहरातील पाण्याची पातळी २० फुटापर्यंत गेल्याने दुकानांतील आणि घरांतील सामान भिजून खराब झाले. या पुरात व्यापार्‍यांचे अब्जो रुपयांचे नुकसान झाले. उद्ध्वस्त झालेले शहर पुन्हा उभे राहणे सर्वांसमोर एक मोठे आव्हान होते. महाराष्ट्रातून आलेली मदत, अनेकांनी मदतीसाठी पुढे केलेले हात शहर पुन्हा उभे करण्यास महत्त्वाचे ठरले. शहर आता बर्‍यापैकी पूर्वपदावर आले आहे. यामुळे लोकांच्या मनातून पुराची भीती निघून गेल्याचे वाटत असले तरी पुन्हा असाच सामना करावा लागेल की काय, या भीतीतून मात्र महाडकर सावरलेले नाहीत.

- Advertisement -

बाजारपेठेत पुन्हा नवीन नवीन उद्योग सुरू केले जात आहेत. त्यामध्ये खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, कपड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात उघडण्यात येत आहेत. नोकरीनिमित्ताने आलेल्या अनेकांनी ‘गड्या आपला गाव बरा’ असे म्हणत घेतलेल्या सदनिका विकून टाकण्यावर भर दिला आहे. शहरातील बहुतांश भागात सध्या बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. मात्र या इमारतींमधील सदनिकांना ग्राहक नसल्याने केवळ हातात घेतेलेले काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. ताक फुंकल्याप्रमाणे जमीन घेताना काळजी घेतली जात आहे. जागा विकत घेणारे या ठिकाणी पाणी आले होते का, असा सवाल करूनच पुढील चर्चेला तयार होत आहेत.

शहरात अशीच स्थिती पुढील काही वर्षांत कायम राहिल्यास आर्थिक गणित ढासळण्यास वेळ लागणार नाही. सद्यःस्थितीत पहिल्या मजल्यावरील सदनिका आणि पार्किंग जागेत बांधलेले गाळे अनेकांनी विक्रीस काढले आहेत. याचे फलक जागोजागी दिसून येत आहेत. हे गाळे मात्र परराज्यातून आलेले व्यवसायिक घेत असल्याचे चित्र देखील पुढे येत आहे. वाढीव दराने सदनिका किंवा गाळे घेऊन पुन्हा पुन्हा पूर येणे परवडणारे नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -