घररायगडवैजनाथ देवस्थानची जमीन बळकावण्यात महाविकास आघाडीतील बडा नेता - किरीट सोमय्या

वैजनाथ देवस्थानची जमीन बळकावण्यात महाविकास आघाडीतील बडा नेता – किरीट सोमय्या

Subscribe

कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील असलेले अनधिकृत असलेले शिवसेनेचे कार्यालय आणि एक मोठे हॉटेल यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले .

कर्जत तालुक्यातील वैजनाथ देवस्थानमध्ये जमीन गैरव्यवहार झाल्याचे सांगत यामध्ये महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे देवस्थान जमीन पाहणी आणि चौकशी करण्यासाठी आले होते.

तालुक्यातील वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान प्रसिद्ध आहे.महाशिवरात्रीला येथे जत्राही भरते. अशा या देवस्थानची जमीन गैरव्यवहार करून एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर केली आणि त्यानंतर ती महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याच्या परिवाराच्या नावे करण्यात आली असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी पत्रकारांना दिली. याबाबत मी तहसीलदार यांच्याशी बोललो असून कागदपत्रांची मागणी केली आहे. जर याची दखल घेऊन कारवाई केली नाही तर पुढील आठवड्यात येथे येऊन आंदोलन करू, असा इशाराही यावेळी सोमय्या यांनी प्रशासनाला दिला.तसेच कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील असलेले अनधिकृत असलेले शिवसेनेचे कार्यालय आणि एक मोठे हॉटेल यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले .

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी वैजनाथ देवस्थानच्या जमीन कागदपत्रांची आमच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली होती. ती आम्ही दिली.
– विक्रम देशमुख, तहसीलदार कर्जत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -