घरठाणेरेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवा

रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवा

Subscribe

खासदार राजन विचारे यांच्या सूचना

ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी मंगळवारी मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक गोयल तसेच रेल्वेचे सर्व संबंधित अधिकारी व ठाणे महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत संपूर्ण ठाणे रेल्वे स्थानकाचा पहाणी दौरा केला. त्यानंतर सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या तातडीने सोडविण्याबाबत खासदार विचारे यांनी सूचना केल्या आहेत.

धोकादायक इमारतीचे काम पाडण्याचे काम सुरू आहे. या जागेवर अत्याधुनिक इमारत उभी राहावी यासाठी सुप्रसिद्ध आर्किटेक हितेन सेठी असोशियन यांच्यामार्फत या ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा त्यांनी बनवला होता त्याचे सादरीकरण करण्यात आले.ठाणे रेल्वे स्थानकाचा इतिहासाप्रमाणे याचा आराखडा बनविण्यात आलेला आहे. परंतु या इमारतीसाठी लागणारा निधी रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर करून घेण्याची जबाबदारी खासदार राजन विचारे यांनी घेतली आहे. पार्किंग प्लाझाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले आहे. रेल्वे प्रशासन फेब्रुवारी अखेरपर्यंत उर्वरित काम पूर्ण करणार आहे. ठाणे महानगरपालिकेने ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई कल्याण दिशेस पादचारी पुलासाठी निधी उपलब्ध करून दिलेल्या पादचारी पुलाचे कामही ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे.ठाणे कोपरी पूर्व सॅटिस प्रकल्प आवश्यक लागणाऱ्या परवानगी रेल्वेने महापालिकेला दिली असल्याचे निदर्शनास आणून दिले.

- Advertisement -

दिघा रेल्वे स्थानकाचे काम ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार
ठाणे-वाशी हर्बल मार्गावरील फेऱ्या मधील वाढ तसेच ऐरोली एलिव्हेटेड या मार्गातील दिघा रेल्वे स्थानकाचे काम ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन एम आर व्ही सी चे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी दिले आहे. त्यामध्ये सरकते जिने व लिफ्टची सुविधा ठेवण्याच्या सूचना खासदार राजन विचारे यांनी दिलेल्या आहेत.

पाच आणि सहा क्रमांकाच्य फलाटावर शौचालय उभारा
रेल्वे स्थानकात शौचालयाची कमतरता रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जास्त करून ५ व ६ नंबर फलाटावरील लांब पल्ल्याच्या गाड्या जे थांबले जाते त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी शौचालयांची उभारणी करावी अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

महिला डब्यात सुरक्षा वाढवा
ठाणे रेल्वे स्थानकात महिलांच्या डब्यात पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही वाढवावे तसेच स्थानकात फेरीवाल्यांचे बस्तान मांडून न देण्याचे आदेश जी आर पी व आरपीएफ पोलिसांना दिले आहे.ठाणे रेल्वे स्थानकात इंटरनेटची सुविधा मोफत असल्याने तासन तास मुले मुली स्थानक परिसरात बसून छेडछाडीचे प्रमाण अधिक वाढले आहे. याकडे लोहमार्ग पोलिसांनी विशेष लक्ष देऊन टाईमपास करणाऱ्या मुला मुलीना स्थानकाच्या बाहेरचा रस्ता दाखवावा अशा सूचना खासदारांनी यावेळी केले आहेत.

जोपर्यंत पुनर्वसन नाही तोपर्यंत जागा खाली करणार नसल्यावर शिवसेना ठाम

नुकत्याच मध्य रेल्वेकडून रेल्वे रुळाला लगत असणाऱ्या झोपड्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या यासंदर्भात नौपाडा बी केबिन येथील ५५ रहिवाशांनी खासदार राजन विचारे यांची भेट घेतली होती. आज या पाहणी दौऱ्यात मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक आले असताना त्यांना नागरिकांच्या वतीने पत्र दिले आहे. या पत्रात हे नागरिक इसवी सन १९६७ पासून येथील रहिवासी आहेत ते ठाणे महानगरपालिकेचा नियमित मालमत्ता कर, पाणी बिल व विद्युत बिल भरत आहेत. त्यामुळे या नागरिकांचे जोपर्यंत यांचे पुनर्वसन करत नाही तोपर्यंत त्यांची राहते घरे निष्कासित होता कामा नये असे या पत्रामध्ये असेही म्हटले आहे. खासदार राजन विचारे यांनी उपस्थित असलेल्या रहिवाशांना घाबरण्याचे कारण नाही, शिवसेना आपल्या पाठीशी ठाम आहे असा त्यांना दिलासा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -