घररायगडजिल्ह्यात जलजागृतीतून लोकचळवळ उभी करावी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण...

जिल्ह्यात जलजागृतीतून लोकचळवळ उभी करावी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

Subscribe

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या नॅशनल वॉटर मिशनमार्फत मंगळवारपासून जल शक्ती अभियान-कॅच द रेन हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा रायगड जिल्ह्यात शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पावसाचा प्रत्येक थेंब संकलित करण्यासाठी जिल्ह्यात जलजागृतीतून लोकचळवळ उभी करावे, तसेच प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करून, पाणी स्त्रोत बळकटीकरण, संवर्धन व पुर्नभरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मंगळवारी (ता.२९) जलशक्ती अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी संबंधित अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांना केले.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या नॅशनल वॉटर मिशनमार्फत मंगळवारपासून जल शक्ती अभियान-कॅच द रेन हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा रायगड जिल्ह्यात शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी पुरवठा विभागातील अधिकार्‍यांसह ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.

- Advertisement -

केंद्र शासनाने जलशक्ती अभियानांतर्गत पाऊस पाणी संकलन ही मोहीम राबविणेबाबत सूचना दिलेल्या असून, २९ मार्च ते ३० सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यात या अभियानातंर्गत विविध कामे हाती घ्यावीत. शाळा, अंगणवाडी इमारती तसेच जिल्हा परिषद अखत्यारीत असलेल्या इतर इमारतींमध्ये पाऊस पाणी संकलन योजना राबवावी. प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करून, तो ग्रामसभेत मांडवा व ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेऊन आराखड्याला अंतिम स्वरूप देऊन अमलबजावणी करावी, तसेच नागरिकांना जलशपथ द्यावी, अशा सूचना डॉ. किरण पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच अभियानातंर्गत करण्यात येणारी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक जयवंत गायकवाड उपस्थित होते.

- Advertisement -

जलशक्ती अभियानातील उपक्रम
– प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे १ एप्रिल ते ७ एप्रिल या कालावधीत आयोजन करून जल साक्षरता निर्माण होण्यासाठी नागरिकांना जल शपथ घ्यावी आणि पाण्याच्या संवर्धनाबाबत चर्चा व जनजागृती करावी.
– प्रत्येक महसुली गावाचा गावनिहाय कृती आराखडा तयार करावा व त्यानंतर उपलब्ध पाण्याचे स्त्रोतांच्या नोंदी घ्याव्यात.
– अभियान कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचा सहभाग आवश्यक असून त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जल संधारणाची तसेच पाण्याचे तलाव, जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन इत्यादी कामे हाती घ्यावीत.
– पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत झिरपण्यासाठी पाऊस पाणी संकलन व पाण्याच्या स्त्रोतांचे पुनर्भरण करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा.
– वन क्षेत्रात पाऊस पाणी संकलनाची साधने निर्माण करावीत व मान्सून काळात वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने खड्डे व रोपे तयार ठेवण्याचे नियोजन करावे.
– शासकीय इमारती, शाळा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी छतावरील पाऊस पाणी संकलन करण्यासाठी कामे हाती घ्यावीत.
– स्व. मीनाताई ठाकरे योजनेतंर्गत ग्रामीण पाणी साठवण टाक्यांची आवश्यकतेनुसार उभारणी करणे, पागोळी विहीर, बंद असलेली भूमिगत साठवण टाकी इत्यादींमध्ये पाऊस पाणी संकलनाचे नियोजन करावे.
– अभियान यशस्वी होण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, जलसुरक्षक, ग्राम पाणी पुरवठा सदस्य या सर्वांचा सहभाग घेऊन गावात जनजागृती मोहीमेचे आयोजन करावे.
– गावातील पाण्याचे स्त्रोतांचे जीओ टॅगिंग करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे.
– अभियानांतर्गत केलेल्या कामांची नोंद तत्काळ जलशक्ती मंत्रालयाच्या संबंधित संकेतस्थळावर करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -