घररायगडशिवाजी वाळण कोंड धबधब्यावर पोहायला गेलेल्या कॉलेज तरुणाचा बुडून मृत्यू; महाड जिल्ह्यातील...

शिवाजी वाळण कोंड धबधब्यावर पोहायला गेलेल्या कॉलेज तरुणाचा बुडून मृत्यू; महाड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Subscribe

महाड : महाड (Mahad) तालुक्यातील शिवाजी वाळण कोंड (Shivaji Valan Kond) येथील निर्जन आणि प्रकाश झोतात नसलेल्या धबधब्यावर पोहायला गेलेल्या सात महाविद्यालयीन तरुणांपैकी एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (7 ऑगस्ट) महाड येथे घडली. (College youth drowned while swimming at Shivaji Valan Kond waterfall Shocking incident in Mahad district)

हेही वाचा – रस्त्याचा झाला ‘चिखल’, गावकऱ्यांनी केली रस्त्यातच भात लागवड

- Advertisement -

महाड तालुक्यातील दहिवड गावचा रहिवासी असणारा स्मित घाडगे (Smit ghadge) हा वीस वर्षीय युवक जवळच असणाऱ्या शिवाजी वाळण कोंड येथील धबधब्यावर गावातील अन्य सात मुलांबरोबर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा मोठा भाऊ देखील त्याच्याबरोबर होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सोबत असणाऱ्या सात मुलांपैकी स्मित घाडगे या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिवाजी वाळन कोंड येथील धबधब्यावर दुपारी बाराच्या सुमारास घडली.

शिवाजी वाळन कोंड येथील निर्जनस्थळी असणाऱ्या धबधब्यावर पोहायला गेलेले दहिवड गावचे हे युवक हे पाण्यात पोहत असताना स्मित घाडगे याचा मोठा भाऊ हा पाण्यात बुडायला लागला. यावेळी स्मित घाडगे त्याच्या मोठ्या भावाला वाचवायला गेला, परंतु त्याचाच बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने दहिवड गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Satara Crime : कुख्यात गुंडावर न्यायालय परिसरातच गोळीबार; साताऱ्यात खळबळ

शिवाजी वाळन कोंड येथील स्मित घाडगेचा मृतदेह काढण्यासाठी एडवेंचर सोल या संस्थेने अथक मेहनत घेतली. अखेर धबधब्यातील स्मित घाडगे यांचा मृतदेह शोधून तो महाड ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे याबाबत पुढील तपास करीत आहेत. याबाबत शोध कार्यात भाग घेणारे ॲडव्हेंचर सोलचे विशाल खांबे, समीर विचारे, प्रसाद देवरुखकर, यश पवार, कुमार केंद्रे, व्यंकोजी लुष्टे, रोशन सावंत, प्रवीण सकपाळ, संकेत मल्लक, चंद्रकांत सावरटकर, इत्यादीसह एनडीआरएफच्या पथकानीही स्मित घाडगेचा मृतदेह शोधण्यात कामगिरी बजावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -