घररायगडबोरज फाटा ते दाभीळ रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत

बोरज फाटा ते दाभीळ रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत

Subscribe

बोरज फाटा ते देवळे हळदूळे दाभीळ ह्या ८ किलोमीटर आणि देवळे करंजे लहूळसे या ७ किलोमीटर अंतरांच्या गावांच्या हद्दीतील अंर्तगत रस्त्यांवर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. तर रस्त्याच्या मोर्‍या डोंगरमाथ्यावरुन वाहून येणार्‍या पाण्याच्या लोंढयाने वाहून नेल्या होत्या.

तालुक्यात २२ जूलै २०२१ रोजी झालेल्या तुफान अतिवृष्ठीत दरडी कोसळून देवळे परिसरातील अति दुर्गम भागातील गावांना जोडणार्‍या रस्यांची अक्षरश : वाताहात झाली होती. आजूबाजूच्या परिसरातील दहा गावांचा जगाशी संपर्क तूटला होता. अशा आपत्ती काळात रस्त्यांवर आलेल्या दरडी तहसिल कार्यालया मार्फत हटविण्यात येऊन वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र ९ महिने उलटले असून पाऊस दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत खराब अवस्थेतील जिल्हा ग्रामीण रस्त्यांची दुरुस्तीची कामे अद्याप रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या भागातील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

बोरज फाटा ते देवळे हळदूळे दाभीळ ह्या ८ किलोमीटर आणि देवळे करंजे लहूळसे या ७ किलोमीटर अंतरांच्या गावांच्या हद्दीतील अंर्तगत रस्त्यांवर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. तर रस्त्याच्या मोर्‍या डोंगरमाथ्यावरुन वाहून येणार्‍या पाण्याच्या लोंढयाने वाहून नेल्या होत्या. त्यामुळे या गावांचा एकमेकांशी आणि तालुक्याशी संपर्क तुटला होता. यावेळी जेसीबी यंत्रे आणि डंपरच्या सहाय्याने तातडीने आठ दिवसांत वाहतूक सुरू करण्यात येऊन या परिसरातील रस्याच्या आजुबाजूची आठ ते दहा गावे व वाडयांतील जनतेला मोठा दिलासा तहसील कार्यालयाने दिला. मात्र या वाताहात झालेल्या २ स्त्यांच्या दुरुस्तीकडे रायगड जिल्हा परिषद व जिल्हा बांधकाम विभाग या यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दोन्ही महत्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण तातडीने करावे अशी मागणी ग्रामीण जनता करत आहे.

- Advertisement -

अतिवृष्ठीत करंजे पायटे वाडी गावाच्या नळ पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन पूर्णपणे बाद झाली असून लहूळसे पाणीपुरवठा योजनेची विहीर वाहून गेली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. लहूळसे पाणीपुरवठा योजनेचे काम शासनाने जलजीवन योजनेअंर्तगत मंजूरही केले आहे. मात्र, हे काम सुरू करण्यात आले नसल्याने काम तातडीने सुरु करावे अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे. तसेच दाभीळ ते लहूळसे या दोन गावांना जोडणारा साकव वाहून गेला आहे. त्यामुळे लहूळसे शाळेमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -