घरदेश-विदेशPresident and Vice President Election 2022 : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी यंदा महिलांना...

President and Vice President Election 2022 : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी यंदा महिलांना मिळणार संधी?

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या जुलैअखेरीस संपूष्टात येत आहे. त्यामुळे देशात राष्ट्रपतीपदासह उपराष्ट्रपती पदासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तसेच त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या या पदांसाठी पाच महिलांची नावे चर्चेत येत आहे. नेमकी ही नाव कोणती आहेत आणि कोणत्या महिलांना संधी मिळू शकते ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ..

उत्तर प्रदेशसह चार राज्यातील यशानंतर भाजपच्या नेतृत्त्वाने आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. भाजप यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करत आहेत. भाजप यंदा या पदांसाठी पाच महिलांना संधी देणार असल्याचे बोलले जात आहे. यात एका मराठमोळ्या महिलेच्या नावाची विशेष चर्चा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या पाच नावांपैकी कोणाचे पारडे जड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पंतप्रधान मोदी एका नावावर शिक्कामोर्तब करतात की नेहमीप्रमाणे आश्चर्यकारक घेतात याकडे लक्ष लागून आहे. मागील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनेक नावे समोर आली मात्र मोदींनी ऐनवेळी रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करत अनेकांना बुचकळ्यात पाडले. दरम्यान दोन वर्षानंतर देशात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होती, त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये मोदी काय खेळी खेळणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

भाजप नेतृत्त्वाकडून ज्या नावांचा विचार सुरु आहे त्यामध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसूया उईके, तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आणि झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचा समावेश आहे. यापैकी मुर्मू आणि उईके आदिवासी समाजाच्या आहेत. आजपर्यंत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद हे आदिवासी महिलेनं भूषवलेले नाही. त्यामुळे यंदा आदिवासी महिलेला यंदा या पदांसाठी संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहे.

सध्या देशात पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष या चार महत्त्वाच्या पदांवर पुरूषांची मक्तेदारी आहे. त्यामुळे यंदा महिला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी महिलांना संधी मिळू शकते. यात तीन नावं प्रखर्षाने समोर येत आहे. ती म्हणजे लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची नावं समोर येत आहेत.

- Advertisement -

यात मराठमोळ्या सुमित्रा महाजन या लोकसभेच्या माजी अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यांचा जन्म कोकणातील चिपळून येथे झाला. इंदोरच्या जयंत महाजन यांच्याशी त्याचा विवाह झाला त्यामुळे पुढे त्या मध्यप्रदेशातच स्थायिक झाल्या. यानंतर त्या मध्य प्रदेशाच्या इंदौरमध्ये सलग 1989, 1991, 1996, 1998, 1999, 2004 2009, आणि 2014 रोजी संसदेत निवडून गेल्या, तर आठवेळा त्यांनी खासदारकी देखील भूषवली आहे, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यानंतर त्या दुसऱ्या मराठी राष्ट्रपती झाल्या.

दरम्यान राष्ट्रपती पदाच्या चर्चेत आनंदीबेन पटेल यांचे नाव चर्चेत आहे. आनंदीबेन पटेल या गुजरातच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. शिवाय छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या राज्यपाल होत्या.

याशिवाय ओदिशाच्या रहिवासी असलेल्या झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू द्रौपदी यांचेही नाव विशेष चर्चेत आहे. त्या भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाच्या दीर्घकाळ उपाध्यक्षा होत्या. बिजू जनता दलासोबतच्या भाजप युतीच्या सरकारमध्ये २००२ ते २००४ दरम्यान त्या मंत्री राहिल्या आहेत.

त्यामुळे मतदारांमधील महिलांचा मोठा वाटा लक्षात घेत भाजपं यंदा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी महिलेला संधी देण्याचा विचार सुरु असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे यंदाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -