घरताज्या घडामोडीचंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, वसंत मोरेंची मनसेच्या उत्तरसभेत कबुली

चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, वसंत मोरेंची मनसेच्या उत्तरसभेत कबुली

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेवर पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे नाराज होते. राज ठाकरेंचा आदेशांविरोधात भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहेत. यानंतर त्यांनी ठाण्यात मनसेच्या उत्तरसभेत भाजपसहित सगळ्या राजकीय पक्षांची ऑफर आली होती अशी माहिती दिली आहे. चर्चेतील चेहरा पुरस्कारावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती अशी कबुली वसंत मोरे यांनी दिली आहे.

पुणे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरेंनी महाराष्ट्रात ब्लू प्रिंट आणली, ती प्रिंट आपण कुठपर्यंत पोहोचवली, पुण्यात दोन नगरसेवक आम्ही आहोत जर ती ब्लू प्रिंट पाहायची असेल तर कात्रज आणि कोंडव्यात या काय विकास केलाय ते दाखवतो, १०० नगरसेवक असताना काम होत नाही परंतु दोन नगरसेवक असताना जे काम करुन दाखवले आहे. पुण्यात २ नगरसेवक आहे २९ नगरसेवकांची सत्ता होती पंरतु काही प्रभागनिहाय कारणांमुळे अडचणी आल्या आहेत.परंतु आजसुद्धा दोघांनी काम केले आणि पुरस्कार घेण्याची वेळी आहे. भाजपचे पुणे मनपामध्ये १०० नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४६ आणि शिवसेनेचे १० काँग्रेसचे नगरसेवक १० आणि मनसेचे २ नगरसेवक आहेत. तरिसुद्धा चर्चेतील चेहरा हा मनसेच्या नगरसेवकाला जातो म्हणजे आम्ही १०० टक्के काम केले आहे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने काम केले पाहिजे.

- Advertisement -

राज्यात कोणत्याही कार्यक्रमाला गेले आणि कोणत्याही कार्यक्रमाला, अविनाश जाधव आणि राजू पाटील यांना नेले तर आपण एक गाणं वाजवतो एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा अविनाश दादा, फक्त आपण गाणे वाजवण्यापूरतेच राहणार आहे का? आपल्याला यांचे काम सुद्धा सामान्य जनतेपर्यंत पोहचवलं पाहिजे. अविनाश जाधव यांनी १००० लग्न लावून दिले आहेत. पुण्यात दोन नगरसेवक आहेत १६ वर्षांत आम्ही १६ उद्याने करणार आहोत. संपूर्ण पुणे शहरात १०० नगरसेवकांची सत्ता आहे परंतु मनसेच्या दोन नगरसेवकांची कामे जास्त होते.

चर्चेतील चेहरा हा पुरस्कार देण्यात आला तेव्हा त्या ठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रावादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे त्या ठिकाणी उपस्थित होत्या. चंद्रकांत पाटील यांनी पाहिले आणि म्हणाले की, आरे तुम्ही भाजपमध्ये या नगरसेवक व्हाल. तेव्हा त्यांना एकच शब्दात उत्तर दिले की, तुमच्या भाजपच्या नगरसेवकांना पाडूनच आम्ही निवडून आलो आहोत.

- Advertisement -

राज ठाकरेंनी ज्या गोष्टी मांडल्या त्या सगळ्या गोष्टी करताना चांगले काम करण्यास मिळाले. ज्या भूमिका राज ठाकरेंनी मांडल्या त्या विकासात्मक चेहरा म्हणून पुण्यात पुढे नेल्या आहेत. जिथे जिथे मनसेचे नगरसेवक काम करतात त्या सगळ्यांनी गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. राज ठाकरेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपल्याला काम करावे लागेल असे वसंत मोरे म्हणाले आहेत.


हेही वाचा : मुंब्य्राची म्हैस म्हणत देशपांडेंचा नाव न घेता आव्हाडांवर हल्ला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -