घररायगडगावठाण जमिनींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण; खालापुरात होणार पहिला प्रयोग

गावठाण जमिनींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण; खालापुरात होणार पहिला प्रयोग

Subscribe

राज्यातील सर्व गावांच्या गावठाण जमिनिचे अत्याधुनिक जीआयएस आधारित सर्वेक्षण आणि भूमापन होणार असून, सर्वात प्रथम तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे मोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार ईरेश चप्पलवार यांनी दिली.

राज्यातील सर्व गावांच्या गावठाण जमिनिचे अत्याधुनिक जीआयएस आधारित सर्वेक्षण आणि भूमापन होणार असून, सर्वात प्रथम तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे मोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार ईरेश चप्पलवार यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग, भारतीय सर्वेक्षण विभाग आणि भारत सरकार यांच्या संयुक्त सहभागाने सर्व गावांतील गावठाण जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण आणि भूमापन करण्याचा निर्णय झाला आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरुपात अधिकार अभिलेख आणि गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील योजनेच्या आधारावर केंद्र शासनाने गावांतील रहिवाशांसाठी मिळकतीचे स्वामित्व अधिकार देण्यासाठी स्वामित्व योजना संपूर्ण देशामध्ये सुरू केली आहे.

तालुक्यात सर्वप्रथम अशा प्रकारची ड्रोनद्वारे मोजणी होणार असून, केळवली, वणी, बीड खुर्द, जांबरूक आणि खरवली या गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अशी मोजणी होणार आहे. गावठाण भूमापन प्रकल्प योजनेत भारतीय सर्वेक्षण विभागामार्फत ड्रोनद्वारे मिळकतीचे सर्वेक्षण केल्यानंतर प्रतिमांचे भूसंदर्भीकरण आणि अर्थो पडताळणी (अर्थो रेक्टिफिकेशन) करण्यात येईल. तसेच गावठाणातील मिळकतीचा डिजिटल नकाशा तयार करण्यात येईल. सदर नकाशामधील मिळकतींना ग्रामपंचायतीचे मिळकत रजिस्टर जोडण्यात येईल. गावठाण हद्दीतील मिळकतीची नियमाप्रमाणे मालकी हक्काची चौकशी करण्यात येऊन त्याबाबत आज्ञावली विकसित करून मिळकत पत्रिका सनदा भूमी अभिलेख विभागामार्फत तयार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

खालापूर तालुक्यातील गावातील गावठाण मोजणी ड्रोनद्वारे होणार आहे. काही ग्रामपंचायतींनी सहकार्य केले असून, प्रायोगिक तत्त्वावर तालुक्याची निवड झाली आहे. ड्रोनद्वारे अचूक मोजणी होऊन डिजिटल सीमांकन होणार असून, ग्रामपंचायत पातळीवर देखील मालमत्ता पत्रक मिळणार आहे. हा प्रयोग तालुक्यात प्रथम होत असल्याने प्रशासन पूर्णपणे सहकार्य करीत आहे.
– ईरेश चप्पलवार, तहसीलदार

तयार झालेल्या सनदा जनतेला सःशुल्क देण्यात येणार आहेत. गावठाणातील मिळकतधारकांना ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सीमांकन ड्रोन फ्लाइंग आणि चौकशी कामाची माहिती देण्यात येईल. त्यासाठीची नोटीस गावची चावडी आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. ड्रोनद्वारे गावठाण भूमापन पूर्वतयारी म्हणून उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या मान्यतेने गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित गावांच्या ग्रामसेवकांच्या मदतीने ग्रामसभेचे आयोजन करावयाचे आहे. गावठाण हद्द निश्चिती, नोटीस बजावणे, गावठाण हद्दीतील झाडाखालील मिळकतीची मोजणी होणार आहे.

- Advertisement -

झाडाखाली येणार्‍या मिळकती आणि इतर कारणांमुळे ड्रोन छायाचित्र यामध्ये न दिसणार्‍या मिळकतीची मोजणी ईटीएस मशिनने जीपीएसद्वारे करण्यात येणार आहे. ईटीएस मोजणी, जीपीएस रोड नकाशा, पीयूची नकाशा या नावाने उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या मान्यतेने जमाबंदी आयुक्त कार्यालय नागपूर भूमापन शाखेकडे पाठविण्यात येईल.
तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस ठाणे ,तालुक्यामध्ये विमान प्राधिकरण आणि लष्कर विभागाचे कार्यालय असल्यास त्यांना वेळोवेळी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करण्याच्या कामाची माहिती देण्यात येईल. मिळकतीचे सीमांकन केले याबाबत मिळकत धारकाचे निवेदन, स्वयं घोषणापत्र घेण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -