घरपालघरमनोर ग्रामपंचयातीकडूनच पर्यावरणाचा ऱ्हास

मनोर ग्रामपंचयातीकडूनच पर्यावरणाचा ऱ्हास

Subscribe

पालघर तालुक्यातील मनोर परिसरात असलेल्या हात नदीपात्र परिसरात मनोर ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून कचरा टाकत असल्याने या परिसराला कचराभूमीचे स्वरूप आले आहे.

पालघर तालुक्यातील मनोर परिसरात असलेल्या हात नदीपात्र परिसरात मनोर ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून कचरा टाकत असल्याने या परिसराला कचराभूमीचे स्वरूप आले आहे. स्वछतेचा संदेश देणारी ग्रामपंचायतच हा कचरा टाकून पर्यावरणाचा ऱ्हास करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. या कचराभूमीमुळे नदीला मोठा धोका पोहोचत आहे. नदीपात्राचे विद्रुपीकरण होत आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी येत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.

पालघर मनोर मुख्य रस्त्यावरील मनोर ग्रामपंचायत हद्दीतील खुल्या मैदानासमोर असलेल्या स्मशानभुमी परिसरात शेकडो किलो कचरा दररोज ग्रामपंचायतीमार्फत गोळा करून टाकला जात आहे. या कचऱ्याचे वर्गीकरण न करता प्लास्टिकसह सुका व ओला कचरा थेट नदीपात्र परिसरात टाकला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार राजरोस सुरू आहे. ही कचरा टाकण्याची जागा अधिकृत नाही. अनेक पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांनी हा मुद्दा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये अनेकवेळा मांडल्यानंतरही सत्ताधारी ग्रामपंचायत या विषयाकडे कानाडोळा करताना दिसत आहे. हा कचरा नदीपात्र परिसरात टाकल्यामुळे पावसाळ्यादरम्यान नदीचे पाणी वाढले की, तो नदीच्या प्रवाहसह नदीच्या पाण्यात वाहून सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे नदीचे पाणीच नव्हे तर नदी काठावर दोन्ही बाजूला असलेल्या शेतीवर त्याचा परिणाम जाणवत आहे.

- Advertisement -

प्रत्येक ग्रामसभेत कचराभूमीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. मात्र सत्ताधारी पदाधिकारी व हतबल प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
– संतोष जनाठे, नागरिक, मनोर

नदी प्रवाहामुळे हा कचरा शेतकऱ्यांच्या शेतात पसरत आहे. तसेच नदीमध्ये असलेल्या जलचर प्राण्यांच्या खडकाळ प्रदेशात तो पसरून राहत असल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या कचऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. एकीकडे ग्रामपंचायत प्रशासन गाव स्वच्छतेचा नारा देते व दुसरीकडे गोळा केलेल्या कचऱ्याचे कोणतेही वर्गीकरण न करता कचरा थेट नदीपात्रात उघड्यावर टाकून दिला जातो. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक ग्रामसभांमध्ये ग्राम सभेच्या सुरुवातीलाच कचरा भूमीचा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होत असला तरी त्यावर प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी नसल्यामुळे हा प्रश्न दरवर्षी प्रलंबितच राहत आहे.

- Advertisement -

घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रकल्प व त्यासाठी लागणारी जमीन तातडीने उपलब्ध करून घेण्याच्या सूचना मनोर ग्रामपंचायतीला दिलेल्या आहेत.
– चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी, पं. स.पालघर

गेल्या अनेक वर्षांपासून दररोज हजारो किलो कचरा नदीपात्रात म्हणून फेकून दिल्यामुळे कचऱ्याचे अनेक थर निर्माण झाले आहेत. इतकेच नव्हे दरवर्षी हे थर नदीच्या पाण्यामुळे वाहून मोठ्या प्रमाणात कचरा नदीत वाहून घेऊन जात आहे. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील गावठण किंवा ग्रामपंचायतीच्या जागेवर आरक्षण टाकून सर्वानुमते कचराभूमीचा प्रश्न सोडवला जाणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे कचराभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
परिणामी कोणताही विचार न करता गावातला हा कचरा स्वच्छता कर्मचारी थेट पदाधिकाऱ्यांच्या व प्रशासनाच्या सांगण्यावरून स्मशानभूमी शेजारील परिसरात नदीपात्रात टाकत आहे. त्यामुळे स्वच्छतेचे कोणतेही सोयरसुतक ग्रामपंचायतीला नाही. यावर पदाधिकाऱ्यांचा अंकुशही नाही असेच या प्रकारावरून स्पष्ट दिसून दिसून येत आहे. ग्रामपंचायत गाव स्वच्छतेसाठी सुमारे चौदा कर्मचारी कामाला लावून स्वच्छता होत नसेल किंवा येथील कचरा उचलला जात नसेल तर ग्रामपंचायतीने ठेवलेल्या कर्मचाऱ्यांचे काम काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -