घररायगडपोलादपूरात वन विभागाचा वणवा विरुध्द अभियान; ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद

पोलादपूरात वन विभागाचा वणवा विरुध्द अभियान; ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद

Subscribe

साधारण जानेवारी महिन्यापासूनच रानात वणवे लागत असल्याच्या घटना घडतअसल्याचे स्पष्ट झाले असून वणव्याने डोंगर पेटायला लागले की पुढे मे महिन्यापर्यंत हा प्रकार सुरुच राहते आणि वणव्याच्या वावटळीत तालुक्यातील एकापाठोपाठ डोंगररांगा जळून खाक होतात. अशा वणव्यांमध्ये पर्यावरण आणि जैवविविधता नष्ट होत असते. या पार्श्वभूमीवर खाबरदारी म्हणुन तसेच या पर्यावरणाचे रक्षण आणि संर्वधन व्हावे, डोंगर वणव्यांपासून वाचावेत यासाठी पोलादपूर परिमंडळ वनाधिकारी श्याम गुजर यांच्या पुढाकाराने एक अभियान सुरु केले आहे.

पोलादपूर: साधारण जानेवारी महिन्यापासूनच रानात वणवे लागत असल्याच्या घटना घडतअसल्याचे स्पष्ट झाले असून वणव्याने डोंगर पेटायला लागले की पुढे मे महिन्यापर्यंत हा प्रकार सुरुच राहते आणि वणव्याच्या वावटळीत तालुक्यातील एकापाठोपाठ डोंगररांगा जळून खाक होतात. अशा वणव्यांमध्ये पर्यावरण आणि जैवविविधता नष्ट होत असते. या पार्श्वभूमीवर खाबरदारी म्हणुन तसेच या पर्यावरणाचे रक्षण आणि संर्वधन व्हावे, डोंगर वणव्यांपासून वाचावेत यासाठी पोलादपूर परिमंडळ वनाधिकारी श्याम गुजर यांच्या पुढाकाराने एक अभियान सुरु केले आहे. त्यानुसार ते वनरक्षकांच्यासमवेत गावो गावी भेट देत तेथील ग्रामस्थ आणि महिलांना एकत्र आणत वणव्यांविरोधात प्रबोधन केले जात असून गुजर यांच्या या अभियानास गावांमध्ये ग्रामस्थांकडून प्रतिसादही उत्तम मिळत आहे.

परिमंडळ वनाधिकारी गुजर यांनी तालुक्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील डोंगराच्या माथ्यावर आणि मध्यावर वसलेल्या गोळेगणी, क्षेत्रपाळ, परसूले या तीन गावांमध्ये आणि मोरगिरी धनगरवाडी तसेच फौजदारवाडी या दोन वाड्यांमध्ये सभा घेतल्या. तसेच यावेळी गुजर यांनी वनरक्षक पी. एस. जाधव यांचे समवेत ग्रामस्थांना वणवा विझविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

- Advertisement -

वणवे नैर्सर्गिक आणिी अनैसर्गिक कारणांनी लागतात. त्यामुळे पर्यावरण आणि जैवविविधतेचा र्‍हास होतो. तेव्हा जंगले वाचवली पाहिजेत. जीवजंतू, किटक, वन्य पशूप्राणी यांचा अधिवास नष्ट होतो. यासाठी डोंगरात गाव वस्तीच्या आजूबाजूला वणवा लागला तर सर्वांनी एकत्र येतविझवला पाहिजे.
– श्याम गुजर,
परिमंडळ वनाधिकारी, पोलादपूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -