घरक्राइमडोंबिवलीत घातक रसायनाचा साठा जप्त

डोंबिवलीत घातक रसायनाचा साठा जप्त

Subscribe

डोंबिवली : डोंबिवली जवळील खंबाळपाडा गावाच्या हद्दीत १० लाख रुपये किमतीचा घातक रसायनांचा साठा टिळकनगर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात घातक रसायनांचा साठा करणारे व  रसायन खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील नाल्या शेजारी सार्वजनिक रस्त्यावर सकाळी सहा वाजता एका टँकरमध्ये मानवी जीवितास, जलप्रदूषण करणारे उग्र वासाचे घातक रसायन पिंपांमध्ये ओतून घेतले जात आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभागाला मिळाली होती. पोलिसांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना पाचारण करुन छापा टाकला. त्यावेळी तेथे गणेश संपत सोनावणे, पंडीत सोनावणे, एकनाथ अण्णा मार्के उर्फ नाथ यांनी आपल्या ताब्यातील रिकाम्या पिंपांमध्ये मुशरत अहमद खान ( घाटकोपर) याच्या टँकरमधील ज्वालाग्रही, प्रतिबंधित घातक रसायन ओतून घेण्याचे काम सुरू केले होते. अतिशय गुप्तपणे हे काम सुरू असल्याचे छापा पथकाच्या निदर्शनास आले.

- Advertisement -

छापा पथकाने अचानक छापा टाकून रसायनाविषयी विचारणा केली असता आरोपी योग्य उत्तरे देऊ शकले नाहीत. हे चोरीचे घातक रसायन भिवंडी येथील जतीन शहा, मंजितसिंग, गुड्डु उर्फ अफताब यांना विकण्यात येणार होते. असे तपास पथकाच्या निदर्शनास आले.मानवी जीवितास हानीकारक अशा प्रकारचे घातक रसायनाचा साठा करुन त्याची खरेदी- विक्री केल्याच्या कारणावरुन पोलिस शिपाई संतोष राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -