घररायगडकतारमधीलअश्व शर्यतीत माथेरानचा घोडेस्वार अव्वल

कतारमधीलअश्व शर्यतीत माथेरानचा घोडेस्वार अव्वल

Subscribe

प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे मिळाले फळ

 

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

दिनेश सुतार:माथेरान
येथील युवकाने माथेरानचा झेंडा अटकेपार लावला असून कतार या देशामध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय अश्व शर्यतीमध्ये सर्व घोडेस्वारांमध्ये अव्वल येण्याचा मान पटकावला असून या घोडेस्वाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
प्रकाश आखाडे हा एका गरीब घरात आणि कोणत्याही सुविधाच नव्हे तर जायला साधा रस्ताही नाही, अशा गावात जन्माला आलेला मुलगा.त्याच्या लहानपणापासून अठराविश्व दारिद्य्र. २० घरे असलेल्या मागासलेल्या गावामध्ये शाळा,दवाखाना नाही. मात्र आखाडे आपल्या हिम्मत आणि मेहनतीच्या जोरावर माथेरान मध्ये घोडा व्यवसाय करीत होता.येथे फिरावयास आलेल्या एका घोडा मालकाने त्याची घोडेस्वारी बघून त्याच्यातील हुनर पाहुन त्याला मुंबई मध्ये नेला. मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्समध्ये घोड्याची कामे करू लागला.घोड्यावर बसणे,सकाळी ट्रॅकमध्ये घोडा पळविणे अशी कामे करू लागला. इमानेइतबारे काम करत राहिल्यानंतर काही वर्षांनी त्याला घोडेस्वारीचा परवाना मिळाला आणि याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

झेंडा अटकेपार फडकवला
मुंबई रेसकोर्स मध्ये चांगली घोडेस्वारी करत काही रेस जिंकत त्याने अश्व प्रेमींची मने जिंकली.इमानदारीने कार्य पार पाडत त्याने ट्रेनर,आणि मालकांची मने जिंकली.प्रकाश हा गरीब घरात जन्माला आलेला असल्याने इमानदारी काय असते हे त्याला माहित होतं.या इमानदारीच्या जोरावर मुंबई मध्ये नावलौकिक कमावल्यावर त्याला कतार या देशात जाण्याचा योग आला.तिथे गेल्यावर त्याने आपला कसब दाखवण्यास सुरुवात केली.आणि नुकत्याच कतार येथे झालेल्या अश्वशर्यतींमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली रेस जिंकून माथेरानचा झेंडा अटकेपार फडकवला.या घोडेस्वाराची माथेरान मध्ये सर्व स्तरातून वाहवा होत असून अभिनंदनाचा वर्षाव देखील होत आहे.

माथेरानमधील गरीब घोडेवाल्याचा मुलगा घोडा व्यवसाय करीत असताना त्याला मुंबईमध्ये नेला आणि तिथे त्याचे नशीब पालटले.आपल्या कर्तबगारीची जोरावर त्याने परदेशात माथेरानच्या मातीची धमक दाखवत अव्वल आला ज्याने माथेरानमध्ये घोडेस्वारी केली तो जगात कुठेही चांगल्या पद्धतीने घोडेस्वारी करू शकतो, हे प्रकाश आखाडे याने दाखवून दिले आहे. आम्हाला अभिमान आहे या मुलाचा.त्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे.

– शैलेश शिंदे,
माजी अध्यक्ष, स्थानिक अश्वपाल संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -