घररायगडअ‍ॅडलॅब इमॅजिकाचे पाणी १ एप्रिलपासून बंद, पाटबंधारे विभागाची ६२ लाखांची थकबाकी

अ‍ॅडलॅब इमॅजिकाचे पाणी १ एप्रिलपासून बंद, पाटबंधारे विभागाची ६२ लाखांची थकबाकी

Subscribe

खालापूर तालुक्यात अ‍ॅडलॅब इमॅजिका थीम पार्क उभारण्यात आले आहे. या जगप्रसिद्ध थीम पार्कमुळे खोपोली, खालापूरातील जनतेला मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. एवढेच नव्हे तर खालापूर तालुक्यात पर्यटकांचा ओढाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

खालापूरसह रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या अ‍ॅडलॅब इमॅजिकाकडे पाटबंधारे विभागाची ६२ लाख ७८ हजार रूपये थकबाकी आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कलोते धरणातून अ‍ॅडलॅब इमॅजिकाला देण्यात येणारे पाणी आगामी आर्थिक वर्षापासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

खालापूर तालुक्यात अ‍ॅडलॅब इमॅजिका थीम पार्क उभारण्यात आले आहे. या जगप्रसिद्ध थीम पार्कमुळे खोपोली, खालापूरातील जनतेला मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. एवढेच नव्हे तर खालापूर तालुक्यात पर्यटकांचा ओढाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या अ‍ॅडलॅब इमॅजिकामध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासत असते. यासाठी कलोते येथील धरणातून अ‍ॅडलॅब इमॅजिकाला जवळपास १० ते १५ लाख लिटर पाणी देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून पाण्याचा कर अ‍ॅडलॅब इमॅजिकाने भरला नसल्याने दंडासह ही रक्कम ८१ लाखांवर गेली असून मार्च एंडीगच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडून मोठा दबाव टाकल्यानंतर यातील फक्त १८ लाख २२ हजार रुपये कर भरला आहे.

- Advertisement -

मागील दोन वर्षांपासून पाण्याचा कर भरण्यात येत नसल्याने शेवटी त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी आर्थिक वर्षापासून अ‍ॅडलॅब इमॅजिकाला देण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार असल्याचे समजते. खालापूर तालुक्यातील अनेक कंपन्यांकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी असल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एशियन पेंट्स कंपनीकडेही लाखो रूपयांची थकबाकी असून त्याप्रकरणी कंपनी न्यायालयात गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -