घररायगडखांडस येथे बिबट्याची दहशत; शेतकर्‍यांच्या पंधरा बकर्‍या फस्त

खांडस येथे बिबट्याची दहशत; शेतकर्‍यांच्या पंधरा बकर्‍या फस्त

Subscribe

कर्जत-: कर्जत तालुक्याच्या वेशीवर असलेल्या खांडस भागातील अंभेरपाडा आणि धोत्रेवाडी येथील शेतकर्‍यांच्या सुमारे १५ च्यावर बकर्‍यावर हल्ला करत फडशा बिबट्याने पाडल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.बिबटयाच्या (Leopard in khandas) वावरामुळे याठिकाणी शेतकर्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या मृत बकर्‍याचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला असून अधिक तपास वन विभागाकडून केला जात आहे.

कर्जत तालुक्यातील खांडस अंभेरपाडा भाग समजला जातो.यापुढे भीमाशंकर अभयारण्य असून त्यापुढे पुणे जिल्हयाची हद्द सुरू होते. दरम्यान भीमाशंकर अभयारण्यातून वन्यप्राणी लोक वस्तीत येण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाचीवाडीमधील शेतकरी धारवड यांच्या म्हण्यानुसार त्यांच्या चार बकर्‍या हे शेतात चरण्यासाठी सोडल्या असताना सायंकाळी बिबट्याने त्यांचा फडशा पाडला. तर धारवड यांनी शेतात पाहिले असताना त्यांना दोन बकर्‍या मृत अवस्थेत मिळून आल्या. तर पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील धोत्रेवाडी येथील मारुती रामजी दरवडा या शेतकर्‍यांनी देखील जवळच्या माळावर आपल्या सुमारे १४ बकर्‍या चरायला सोडल्या होत्या.त्यापैकी एक बकरी ही गाभण असल्याने त्यांनी तिला थोड चरून झाल्यावर परत आपल्या गोठ्यात आणून सोडली. तर सायंकाळी आपल्या बकर्‍या परत गोठ्यात आणण्यासाठी ते माळावर गेले असता त्यांना काही बकर्‍या या मृत अवस्थेत मिळून आल्या.

- Advertisement -

शेतकर्‍यांनी बिबटया आल्याची माहिती देत नुकसानीसाठी प्रशासनाला माहिती दिली.वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी तसेच ग्रामसेवक, तलाठी यांनी मृत बकर्‍याचा पंचनामा केला.बकर्‍याचा बिबट्याने फडशा पाडल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

  • शेतकर्‍यांकडून माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ धाव घेतली. अंभेरपाडा आणि धोत्रेवाडी येथे प्रत्येकी दोन बकर्‍याचे अवशेष वन कर्मचार्‍यांना मिळून आले आहेत. तर शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बकर्‍याची संख्या जास्त होती. त्यामुळे अधिक तपास करून शासन नियमाप्रमाणे कारवाई करत संबंधितांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
    -प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्जत पुर्व
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -