घरनवी मुंबईशेकापला धक्का! विचुंबेचे माजी सरपंच सदस्यांसह भाजपात

शेकापला धक्का! विचुंबेचे माजी सरपंच सदस्यांसह भाजपात

Subscribe

पनवेल-: तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीत शेकापला जोरदार धक्का बसलेला असताना त्याच ठिकाणी आणखी एक धक्का बसला आहे.शेकापच्या जेष्ठ पदाधिकारी आणि विचुंबेच्या माजी सरपंचांनी भाजपात (shekap leedar in Bjp) प्रवेश केला आहे.

विचुंबे ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सरपंच बळीराम दत्तात्रेय पाटील, नम्रता आकाश पाटील, स्वाती बळीराम पाटील, माजी उपसरपंच भरत दत्तात्रेय पाटील, गुरूनाथ म्हात्रे, सदस्य प्रणाली राम पाटील, प्रमिला गुरूनाथ म्हात्रे, युवा कार्यकर्ते आकाश कृष्णा पाटील, ओमकार बळीराम पाटील, महेंद्र कामटेकर, निलेश ठाकूर, विवेक पाटील, अविनाश पाटील, पूनम भरत पाटील यांनी विकासाचे कमळ हाती घेतले.माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी त्यांचे स्वागत केले. शेकापच्या कार्यशैलीला कंटाळून हा प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

या कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रवीण खंडागळे, सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप विचुंबे गाव अध्यक्ष के.सी.पाटील, सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, सुकापूर सरपंच राजेश पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, उपसरपंच रवींद्र भोईर, माजी सरपंच राम म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील, किरण भोईर, डी.के.भोईर, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष अविनाश गायकवाड, सदस्य अनिल भोईर, अनंता गायकवाड, विवेक भोईर, आनंद गोंधळी, चेतन सुरते, जगदीश भोईर, प्रितेश भिंगारकर, दादा गोंधळी, नागेश भिंगारकर, चेतन भिंगारकर, नितीन भोईर, प्रल्हाद भोईर, नयन भोईर, गणेश सर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -