घररायगडमोहोप्रे गावाजवळील दुर्लक्षित लेणे गाळ्मुक्त

मोहोप्रे गावाजवळील दुर्लक्षित लेणे गाळ्मुक्त

Subscribe

साद सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

 

महाड: तालुक्यातील किल्ले सोनगडकडे जाणार्‍या मार्गावर मोहोप्रे गावाजवळ डोंगराच्या मध्यावर कातळात असलेले प्राचीन लेणे साद सह्याद्री संस्थेने आयोजितसंवर्धन मोहिमेत गाळमुक्त करण्यात आले आहे. काही वर्षे अगोदर साद सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने हाती घेतलेल्या ’शोध अपरिचित ऐतिहासीक स्थळांचा’ या अभियानांतर्गत संस्थेचे सभासद अशोक उम्राटकर यांनी हे लेणे निदर्शनास आणून दिले होते होते.
एकंदरीत या लेण्याची रचना पाहता हे लेणे गांधारपाले येथील बौद्ध लेणी काळातील म्हणजेच इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांतील असावे असे येथे असणार्‍या शिलालेखावरून दिसून येत आहे. शिलालेख हा मुख्य लेण्याच्या आतील भागातील समोरच्या भिंतीवर डाव्या बाजूला छताजवळ आहे असून त्याकाळात प्रचलित असणार्‍या ब्राम्ही लिपीतील आणि प्राकृत भाषेतील असण्याची शक्यता वर्तवली आहे. शिलालेखाच्या पहिल्या ओळीत २६ अक्षरे आणि दुसर्‍या ओळीत ८ अक्षरे आहेत. भिंतीवर आणि शिलालेखावर सफेद रंगाचा क्षार जमा झाला असल्याने काही अक्षरे अस्पष्ट झालेली आहेत, तरीही यातील बरीच अक्षरे ओळखू येतात,त्यांचा सखोल अभ्यास झाल्यास महाड तालुक्याच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर पडणार आहे.
शेकडो वर्षे ही लेणी वापरात नसल्याने झाडीझुडूपात गुडूप झाली होती. पावसाचा मारा झेलत असताना त्यात जवळपास दोन फूट गाळ साचला होता. हे आव्हान स्वीकारून साद सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे निकेत आयरे, संकेत ढेकणे, महेश चौधरी, दत्ताराम मोरे, कल्पेश सागवेकर, अजय पिंगळे, सुयोग पाटील, महेश जाधव आणि केतन फुलपगारे यांनी या संवर्धन मोहिमेत श्रमदान केले. या संवर्धन मोहीमद्वारे या दुर्लक्षित लेण्यास पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. लेण्यातील गाळ काढून लेणी गाळमुक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

काळाच्या ओघात पडझड
एका खोली स्वरूपातअसणार्‍या या लेण्याच्या समोरच्या भागाची काळाच्या ओघात थोडीफार पडझड झालेली आहे. या मूळ लेण्याचे डाव्या बाजूला असणारे प्रवेशद्वार हे ५ फूट उंच आणि ४ फूट रुंदीचे असून त्याच्या उजव्या बाजूला २ चौरस फूटांची खिडकी आहे. खिडकी असणारा कातळभाग हा कोसळला आहे, भिंतीचा काही भाग अधांतरी राहिल्याने वैशिष्ठ्यपूर्ण रचना निर्माण झाली आहे. मुख्य लेणे हे लांबी १० फूट,रुंदी १० फूट, उंची ८ फूट असे साधारण चौरस आकारात हे लेणे खोदलेले आहे. लेण्याच्या डाव्या बाजूला समांतर २ फूट उंचीचे बाकडे खोदत असताना ते एल आकारात समोरच्या भिंतीलगत कोरले आहे. लेण्याच्या उजव्या कोपर्‍यातील कोनाडा ३ फूट आत काटकोनात खोदलेला आहे तिथे देखील २ फूट उंचीचे बाकडे कोरलेले आहे.

सदर लेणी आणि शिलालेख सातवाहन काळातील असून त्याची भाषा प्राकृत तर लिपी ब्राह्मी आहे. यापूर्वी गांधारपाले लेणी येथे तीन शिलालेख उपलब्ध झाले असून त्यांचा कालखंड अभ्यासाकांच्या मते दुसरे तिसरे शतक आहे. सदरील शिलालेखाचा अभ्यास केल्यावर त्यावरील कालखंडावर जास्त प्रकाश टाकता येईल .
– डॉ. अंजय धनावडे,
अध्यक्ष, कोकण इतिहास परिषद,रायगड शाखा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -