घररायगडघणसोलीत फटाके विक्रेत्यांनी काढले ग्रिल

घणसोलीत फटाके विक्रेत्यांनी काढले ग्रिल

Subscribe

व्यवसाय तेजीसाठी लढवली शक्कल

 

 

- Advertisement -

 

बेलापूर :
दीपावलीच्या कालावधीत पालिकेने काही फटाके व्यावसायिकांना फटाके विक्री करण्याची परवानगी दिली.त्या नुसार फटाके व्यावसायिकांनी स्टॉल उभारून फटाके विक्री करण्यास सुरुवातही केली.परंतु ग्राहकांना कोणतेही कष्ट न करता थेट फटाके घ्यावेत, यासाठी चक्क पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ग्रिल काढले.यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.त्यानंतर याबाबतच्या तक्रारी पालिका दरबारी गेल्यावर प्रशासन जागे झाले आणि ते ग्रिल पूर्ववत लागले गेले. परंतु पहिल्यासारखी बळकटी त्या ग्रिलला नसल्याने ते चोरीस जाण्याची शक्यता अधिक आहे.
घणसोली सेक्टर १० येथील मेघ मल्हार नावाची सिडकोनी बांधणी केलेली गृहनिर्माण सोसायटी आहे.या सोसायटीच्या बाजूलाच मोकळी जागा आहे.या जागेवर घणसोलीतील मुख्य रस्त्याच्या बाजूला पालिकेच्या अनुमतीने साधारणतः पंधराच्या आसपास फटाके विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते.परंतु स्टॉलच्या समोर असणार्‍या पदपथावर पालिकेने लाखो रुपये खर्च करून ग्रिल कार्यान्वित केले होते.हे ग्रिल ग्राहकांना अडथळा ठरत होते.त्यामुळे ग्राहकांना वळसा घेऊन स्टॉलकडे यावे लागत होते.हा ग्राहकांना त्रास होऊ नये.म्हणून या स्टॉलधारकांनी ग्रिलच अवैधरित्या काढून टाकले होते.त्यामुळे हा विषय घणसोलीमध्ये चर्चेचा झाला होता.विशेष म्हणजे याच प्रकारे घणसोली सेक्टर ७ मध्ये सीएनजी पंपसमोर काहींनी फटाके स्टॉल उभारले होते.पण त्यांनी असे कोणताही कृत्य केले नाही.

- Advertisement -

चोरी होण्याची शक्यता
ज्या फटाके स्टॉलधारकांनी ग्रिल काढले होते.परंतु ग्रिल एकमेकांना घट्ट असल्याने ग्रिल काढताना कापावे लागले होते.यामुळे आता त्या स्टॉलधारकांनी जरी पालिकेचा दाब वाढल्यावर ग्रिल पुनः कार्यान्वित केले आहेत.परंतु पहिल्या सारखे बळकट राहिले नाहीत.यामुळे भविष्यात हे लोखंडी ग्रील चोरीला गेले तर नवल नको अशा चर्चा ऐकण्यास मिळत आहे.मागील काही दिवसात घणसोली विभाग कार्यालय परिसरातील विविध ठिकाणाहून लोखंडी ग्रील चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत.स्टॉल धारकांचे ठिकाण मोक्याच्या ठिकाणी असेल तरी कांदळवन सारख्या निर्मनुष्य ठिकाणी आहे.त्यामुळे चोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

ग्रिल काढलेले दिसले नाही
एका बाजूला घणसोली पामबीच मार्ग,दुसरीकडे. चारही गजबजलेले मार्ग.यांच्या शेजारी ही स्टॉलची दुकाने.तरीसुध्दा काढलेले ग्रिल पालिकेच्या लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

अभियांत्रिकी विभागा कडून काढलेल्या ग्रिल संबंधी अहवाल विभाग अधिकार्‍यांना दिला आहेत.त्यावर ते पुढील कार्यवाही करतील.
– देवेंद्र पाटील,अभियंता,घणसोली.

अहवाल प्राप्त झाला आहे.त्यानुसार स्टॉलधारकांची आमच्या कडे जमा केलेली अनामत रक्कम पुन्हा त्यांना दिली जाणार नाही.तसेच गुन्हेही दाखल केले जातील.
– शंकर खाडे,सहाय्यक आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -