घररायगडमाझी वसुंधरा अभियानात ५३० ग्रामपंचायतींचा सहभाग

माझी वसुंधरा अभियानात ५३० ग्रामपंचायतींचा सहभाग

Subscribe

पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये व ग्रामपंचायतीमध्ये ५ जून २०२१ पासून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार्‍या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

राज्यातील स्स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातही या अभियानाला प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अभियानात जिल्ह्यातील ५३० ग्रामपंचायतींनी नोंदणी करून सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाना ३१ मार्च अखेरपर्यंत केलेल्या कामांची माहिती दुसर्‍या टप्प्यातील एमआयएसमध्ये १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत भरावयाची आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांची कार्यशाळा जिल्हा परिषदेत मंगळवारी (ता.२९) पार पडली.

पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये व ग्रामपंचायतीमध्ये ५ जून २०२१ पासून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार्‍या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या या अभियानात रायगड जिल्ह्यातील ५३० ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला आहे. माझी वसुंधरा अभियान हे अभियान नव्याने सहभागी ग्रामपंचायतींसाठी एकूण ५ हजार गुणांचे आहे. गतवर्षी सहभागी ग्रामपंचायतीसाठी २०२०-२०२१ या वर्षातील झालेल्या कामांच्या देखाभाल व सातत्य यासाठी ४५० गुण असून, मागील सहभागासाठी ५० गुण असे एकूण ५ हजार ५०० गुण असणार आहेत.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थाना ३१ मार्च २०२२ अखेरपर्यंत केलेल्या कामांची माहिती दुसर्‍या टप्प्यातील एमआयएसमध्ये १ एप्रिल २०२२ ते १५ एप्रिल २०२२ या कालावधीत भरावयाची आहे. या एमआयएसच्या आधारे स्थानिक संस्थाचे डेस्कटॉप मूल्यमापन होणार आहे. त्या अनुषंगाने या अभियानात रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यासाठी २९ मार्च रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निसर्गाशी संबधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांशी निगडीत जीवन प्रणाली अंगीकारून माझी वसुंधरा-स्वच्छ वसुंधरा या संकल्पाला पूर्ण करीन, अशी शपथ देण्यात आली.कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय नोडल अधिकारी विराट राजपूत व अरुंधती कामत यांनी मार्गदर्शन केले.

अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्द्याशी संबंधित कामे केली जात आहेत. तर वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनार्‍याची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणार्‍या बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जात आहे.

- Advertisement -

माझी वसुंधरा अभियानात कोकण विभागात रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. सहभागी ग्रामपंचायतींमध्ये गाव कृती आराखडे तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, नेहरु युवा केंद्र, एन.एस.एस., पर्यावरण स्नेही, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध घटकांचे योगदान लाभत आहे.
– डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -