घररायगडपीएम स्वनिधी योजना म्हणजे उद्योजक होण्याची संधी! मुरुड न.प.च्या कॅम्पला प्रतिसाद

पीएम स्वनिधी योजना म्हणजे उद्योजक होण्याची संधी! मुरुड न.प.च्या कॅम्पला प्रतिसाद

Subscribe

मुरुड-:
पीएम स्वनिधी योजना म्हणजेच पंतप्रधान स्ट्रीट वेंडरची आत्मानिर्भर निधी योजना सुरू झाली आहे. मुरुड नगरपरिषद क्षेत्रातील व्यवसाय करु इच्छिणार्‍यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेतून (Prime Minister’s Own Fund) सूक्ष्म उद्योगाच्या खेळत्या भांडवलाचा लाभ घेता यावा याकरीता नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे  यांच्यावतीने कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

या कॅम्पमध्ये मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, कर विभाग अधिकारी नंदकुमार आंबेतकर, लेखापाल कपिल वेहेले, संजय वेटकोळी, सतेज निमकर, पल्लवी डोंगरीकर, स्मिता मुरुडकर त्याच प्रमाणे अर्थ पुरवठा करणार्‍या विविध बँकांचे प्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले होते. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून शहरातील छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी १० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती कर विभागाचे अधिकारी नंदकुमार आंबेतकर यांनी दिली.

- Advertisement -

कर्ज मिळण्यासाठी ३२५ लाभार्थ्यांचे शिफारस पत्र नगरपरिषदेकडे प्राप्त झाली आहेत. ही शिफारस पत्र शहरातील विविध शासकीय बँकांना कर्ज मंजूरीसाठी पाठवण्यात आली असून लवकरच लाभार्थींच्या बँकेतील खात्यामध्ये दहा हजार रुपये रोख रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती लेखापाल कपिल वेहेले यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -