घरमहाराष्ट्र"बारामतीत माझ्याविरोधात कोणीही लढणार...", सुप्रिया सुळेंची सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर प्रतिक्रिया

“बारामतीत माझ्याविरोधात कोणीही लढणार…”, सुप्रिया सुळेंची सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर प्रतिक्रिया

Subscribe

सातारा : बारामतीत माझ्याविरोधात जो कोणीही लढणार, त्याचे स्वागत आहे. कारण माझे राजकारण आणि समाजाकारण संविधानाच्या चौकटीतीले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुळे यांनी सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा बुधवारी (18 ऑक्टोबर) रोजी वाढदिवसा निमित्ताने बॅनर लागले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील येथे सुनेत्रा पवारांचे बॅनर लागले होते. या बॅनरमध्ये सुनेत्रा पवार यांचा संसदे चित्र असलेले बॅनर लावण्यात आले आहे.

या बॅनवर सुप्रिया सुळेंनी आज साताऱ्या मध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसा निमित्ताने बारामतीमध्ये बॅनर लागले आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्यासाठी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, माझ्याविरोधात कोणी लढले पाहिजे. भाजपमाझ्याविरोधात एक वेळा नाही तर तीन वेळा लढला आहे. त्यात गैर काय आहे, कोणीतरी लढलेच पाहिजे. मी कोण लढेल त्याचे स्वागत करेन. कारण माझे संविधानावर प्रेम आहे. माझे राजकारण आणि समाजाकारण संविधानाच्या चौकटीतले आहे. त्यामुळे कोणी तरी माझ्याविरोधात लढणारच ना. पोस्टर लावले तर गैर काय? एखाद्या कार्यकर्त्याची इच्छा असेल. आपण उलट त्याचे स्वागत केले पाहिजे.”

- Advertisement -

हेही वाचा – मतांच्या राजकारणासाठी ‘ते’ दहशतवाद्यांचं समर्थन करतायेत; बावनकुळेंची शरद पवारांवर टीका

सुनेत्रा पवार असतील तरी पण तुमची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयार आहात का?, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हा विषय वहिणी आणि माझा नाहीच आहे. ही भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढाई आहे. माझी वैयक्तिक कोणाची लढाई नाही. जे माझ्या विरोधात उभे राहतात, ते थोडी माझे विरोधी आहेत. माझी वैयक्तिक कोणाची लढाई नाही. माझी लढाई ही नैतिक आणि वैचारिक लढाई आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – ‘वेगळे झालो म्हणून काय झाले, मैत्री कायम राहणार’; भाजपबद्दल INDIA आघाडीतील नत्याचे वक्तव्य!

सुनेत्रा पवारांच्या बॅनवर नेमके काय लिहिले

बारामतीमध्ये बॅनरमध्ये लिहले की, “आदरणीय सुनेत्रावाहिनी अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील राजकीय वाटचालीस आपणास शुभेच्छा”, यामुळे आगामी लोकसभा मतदारसंघातून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -