घररायगडमुरुडमध्ये वाहनाच्या धडकेत माकडीणीसह पिल्लाचा मृत्यू

मुरुडमध्ये वाहनाच्या धडकेत माकडीणीसह पिल्लाचा मृत्यू

Subscribe

मुरुड तालुक्यातील मिठागर - भालगांव रस्त्यावर लंगुर जातीची माकडीण आणि तिच्या पिल्लासह रस्ता ओलांडताना अज्ञात भरधाव गाडीने उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मुरुड: तालुक्यातील मिठागर – भालगांव रस्त्यावर लंगुर जातीची माकडीण आणि तिच्या पिल्लासह रस्ता ओलांडताना अज्ञात भरधाव गाडीने उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रस्त्यालगतच्या डोंगरावर लंगूर जातीचे माकड आपलं खाद्य खाण्यासाठी ये-जा करीत असतात. त्यापैकी ३ वर्षाची माकडीण अंदाजे १ महिन्यांच्या तिच्या पिल्लाला घेऊन रस्ता ओलांडताना भरधाव अज्ञात गाडीने उडविल्याने माकडीणचा जागेवर मुत्यू झाला तर पिल्लु तडफडत होता. त्याच रस्त्यावर प्रवास करणारे डोंबिवली येथील मनोज कुलकर्णी घटनास्थळी थांबून दोन्ही लंगुर माकड जीवंत आहेत का ते पाहिले त्यामध्ये लंगूर जातीची माकडीणीचा मुत्यू झाला तर तिचा पिल्लु जीवंत होता. कुलकर्णी यांनी पिल्लाला पाणी पाजल्यावर काही वेळ पिल्लु जीवंत होता. अपघाताची ठोकर ऐवढी मोठी होती त्याला बसता येत नव्हतं, शांत पडून होता. काही तासाने त्याचाही मुत्यू झाला.
याबाबतची माहिती शहरातील सर्पमित्र संदिप घरत यांना मिळताच पोलिस नाईक सागर रसाळ, वनविभाग अधिकारी दिनेश रोटकर आदिंसह घटनास्थळी पोचून मृत्यू पावलेल्या लंगुर जातीच्या माकडीण आणि पिल्लाचा पंचनामा करून त्यांना मुरुडला आणून अग्नी अंत्यसंस्कार केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -