घररायगडमहाड येथील कंपनी कामगारांचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच 

महाड येथील कंपनी कामगारांचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच 

Subscribe

महाड येथील औद्योगिक वसाहतीमधील टाईम टेक्नो प्लास्ट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी आपल्या पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा शनिवारी तिसर्‍या दिवशी यातील सहा कामगारांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवले आहे. याबाबत अद्याप कंपनी प्रशासनाने आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही.

महाड: येथील औद्योगिक वसाहतीमधील टाईम टेक्नो प्लास्ट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी आपल्या पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा शनिवारी तिसर्‍या दिवशी यातील सहा कामगारांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवले आहे. याबाबत अद्याप कंपनी प्रशासनाने आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही.
महाड एमआयडीसीमध्ये टाईम टेक्नो प्लस नावाचा प्लास्टिक ड्रम बनवण्याचा कारखाना आहे. गेली अनेक वर्षे हा कारखाना सुस्थितीत सुरू असला तरी कोरोना काळाच्यानंतर याला उतरती कळायला लागली आहे. गेली काही दिवसापासून कंपनी प्रशासन आणि कामगारांमध्ये धुसपूस सुरु आहे. कंपनी प्रशासनाने सन २०१६ मध्ये केलेला पगार वाढीचा करार सन २०२० मध्ये संपला आहे. यामुळे नवीन करार करून पगार वाढ केली जावी अशी मागणी कंपनी कामगारांनी केली आहे. कामगारांच्या सांगण्यानुसार संपलेला कंपनी करार पुढे लागू करण्याकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तर ठाणे लेबर कोर्टाकडून कामगारांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीनुसार कंपनीत काम करायचे असेल तर लागेल ते काम करावे लागेल अन्यथा कंपनी बाहेर व्हावे लागेल, अशी नोटीस बजावली असल्याचे सांगितले. यामुळे गेली ३० दिवसांहून अधिक दिवस कामगार कंपनीच्या बाहेर आहेत. तीन दिवसांपूर्वी मात्र कंपनी कामगारांनी रीतसर आमरण उपोषणाचा इशारा देत उपोषणात्मक आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा शनिवारी तिसर्‍या दिवशी अद्याप कोणत्याच प्रकारची चर्चा न झाल्याने यातील काही कामगारांची तब्येत बिघडू लागली आहे.

कंपनी आणि प्रशासनाने योग्य तो मार्ग काढला पाहिजे, कंपनी व्यवस्थापन याबाबत लक्ष देत नाही. कामगारांनी केलेली मागणी रास्त आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील सर्व राजकीय संघटना देखील कामगारांच्या पाठीशी आहोत.
– संतोष कदम,
अध्यक्ष, भारतीय कामगार संघटना, महाड युनिट
————

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -