घररायगडनिवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी रायगडमध्ये कडेकोट बंदोबस्त; ३० ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढतीचा अंदाज...

निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी रायगडमध्ये कडेकोट बंदोबस्त; ३० ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढतीचा अंदाज   

Subscribe

रायगड जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी १९० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये १६४  ग्रामपंचायती या रायगड जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील आहेत. ग्रामपंचायतींच्या राजकीय दृष्ट्या असणाऱ्या हालचालींवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. निवडणुका शांतातेत पार पाडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल २ हजार ४०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

अलिबाग: रायगड जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी १९० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये १६४  ग्रामपंचायती या रायगड जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रायगड पोलीस अक्शन मोडवर आले आहेत. ग्रामपंचायतींच्या राजकीय दृष्ट्या असणाऱ्या हालचालींवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. निवडणुका शांतातेत पार पाडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल २ हजार ४०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
यावेळी रायगड जिल्हा अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि  जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण भोर , सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडाव्यात यासाठी  उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत राजकीय प्रतिनिधींच्या बैठक पार पडल्या आहेत. पोलिसांच्या दृष्टीने राजकीय संवेदनशील असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये रूट मार्च काढण्यात आला होता. ३१० जणांना परवाना असणारी शस्त्र जमा कानयच्या सूचना देऊन शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी ४९ तर पोलीस निरीक्षक यांनी २२८ वेळा निवडणूक असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
३० ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होणार असल्याचा अंदाज
 रायगड जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या २१२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १८ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. नामनिर्देशन पात्र दाखल करणे ते उमेदवारी माघार घेण्यापर्यंत रायगड जिल्ह्यात ५० ग्रामपंचायती बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. यामध्ये ४८ ग्रामपंचायती या रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील आहेत. संपूर्ण जिल्ह्यात १९० ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामधील १६४ ग्रामपंचायती या रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये ५०७ मतदान केंद्र असणार आहेत. रायगड पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात ३० ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होणार असल्याचा अंदाज आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
२ हजार ४०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
१८ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये रायगड पोलिसांनी चोख बंदोबस्त वेळ आहे. सुमारे १ हजार ७०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात असणार आहेत. यामध्ये १२७ पोलीस अधिकारी , ८०६ पोलीस अंमलदार एसआरपीएफच्या तीन प्लाटूनमधील १०० जवान, होमगार्ड ५००, दंगल नियंत्रण पथकातील ९० पोलीस अंमलदार, तात्काळ प्रतिसाद पथकातील १४ पोलीस अंमलदार यांचा या बंदोबस्तात समावेश करण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी २ हजार ४०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १०७ अन्वये ४४५ , १०९ प्रमाणे १२ , ११० प्रमाणे २२, १४९ प्रमाणे १ हजार ८०९ आणि ९३ प्रमाणे ८ जणांचा समावेश आहे. निवडणूक असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्या ५ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
मुरुड तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत संचलन
मुरुड: तालुक्यातील काकळघर, कोर्लई, वेळास्ते आणि वावडुंगी या ४ग्रामपंचायतीचे निवडणूक उद्या रविवारी होत असून या या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात आले.यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आढावा घेण्यात आला. यावेळी वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीत संचलन करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे तसेच पोलीस उपनिरीक्षक खुतजा शेख, पोलीस हवालदार दिपक राऊळ, युवराज निकले, पोलिस नाईक परेश म्हात्रे, पोलिस शिपाई सागर रसाळ,वैभव साळुंके तसेच दंगल नियंत्रण पथकाचे २४ अमलदार उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -